Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss Tips | पोटाची चरबी कमी करणे सोपे काम नाही, परंतु व्यायाम आणि आहारात काही आयुर्वेदिक वस्तूंचा समावेश करून तुम्ही स्वताला फिट ठेवू शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणत्या आयुर्वेदिक वस्तूंचा (Weight Loss Tips) आहारात समावेश करावा ते जाणून घेवूयात.

1. अळशीचे बी :
यातील फायबर मेटाबॉलिज्म मजबूत करते. रोज सकाळी रिकाम्यापोटी गरम पाण्यासोबत एक चमचा ही पावडर घ्या. एक तास काहीही खाऊ नका.

2. दालचीनी :
दालचीनी मेटाबॉलिज्म चांगले करते आणि पोटाची चरबी कमी करते. दिवसात दोनवेळा गरम पाण्यात मध आणि दालचीनी मिसळून प्यायल्याने वजन कमी होते. सकाळी नाश्त्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी घ्या.

3. त्रिफळा :
हे बेहडा, हरडा आणि आवळ्याने तयार होते. याच्या सेवनाने पोटाची चरबी तसेच बद्धकोष्ठता दूर होते. रात्री झोपताना एक चमचा चूर्ण एक कप गरम पाण्यात 10 मिनिट ठेवून प्या.

4. जिर्‍याचे पाणी :
एक ग्लास पाण्यात दोन चमचे जीरे टाकून 10 मिनिटे उकळवा. कोमट झाल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी प्या.

5. आवळा :
रोज नाश्त्यात एक आवळा खा किंवा याचा ज्यूस प्या.

Web Title :- weight loss tips add these 5 ayurveda spices to lose belly fat fast

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातही सरकारने निर्बंध शिथिल करावेत; व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा – शहर काँग्रेस उपाध्यक्ष विरेंद्र किराड

NTPC Recruitment 2021 | NTPC मध्ये विविध पदांसाठी भरती; पगार 71 हजार रुपये

Pune Corona Restriction | ‘पालकमंत्री एक, आरोग्यमंत्री दुसरं आणि मुख्यमंत्री तिसरंच बोलतात’