बराच वेळ एकाच ठिकाणी बसून ‘वजन’ वाढलं असेल तर ‘हे’ 5 उपाय करा, दिसाल ‘आकर्षक’

पोलीसनामा ऑनलाइन – एकाच ठिकाणी बसून सात ते आठतपासापेक्षा जास्त वेळ काम केल्याने अनेक महिलांमध्ये लठ्ठपणाची समस्या दिसू लागते. लठ्ठपणा महिलांसाठी जास्त धोकादायक ठरू शकतो. कारण वजन वाढल्याने अनेक आजार शरीरात शिरकाव करतात. ऑफिसमध्ये तासनतास एका ठिकाणी बसून काम केल्याने शरीरात अतिरीक्त चरबी वाढायला सुरूवात होते. हे वाढलेलं वजन कसं कमी करायचं, याबाबत माहिती घेवूयात.

हे उपाय करा

1 आहार नियंत्रण
योग्य आहार घ्या. स्वतःचा डाएड चार्ट बनवा. ऑफिसमध्ये भूक लागल्यानंतर किंवा संध्याकाळच्यावेळी भूक लागल्यानंतर स्नॅक्स टाळा.

2 लवकर झोपा
मोबाईलचा वापर न करता शक्य होईल तेवढ्या लवकर झोपण्याचा प्रयत्न करा.

3 ध्येय ठरवा
वजन कमी करण्यासाठी रोज प्रयत्न करणे गरजेचं आहे. संकल्प करून तो अर्धवट सोडू नका, तो पूर्ण करा. तरच बदल दिसून येईल. व्यायाम नियमीत करा.

4 स्वतःकडे लक्ष द्या
ऑफिसची वेळ, आरामाची वेळ ठरवा. स्वतःसाठी वेळ काढा. व्यायाम करा. जीमला जाऊन वर्कआऊट आणि कार्डिओ व्यायाम करा. यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित राहील. मुड फ्रेश राहील.

5 घरचे जेवण
बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा. बाहेरचे तेलकट आणि तिखट असल्याने वजन वाढते. घरी तयार केलेला नाष्ता अथवा जेवणाचा आहार घ्या . कारण घरी तयार केलेले पदार्थ शरीरासाठी अपायकारक ठरत नाही.