Weight Loss Tips | जिम-डाएटच्या टेन्शनपासून होईल सुटका, केवळ रोज 15 मिनिटे करा हे काम; आपोआप कमी होईल संपूर्ण शरीराचे वजन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss Tips | लठ्ठपणा (Obesity) ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या बनली आहे. आजकाल बहुतेक लोक वाढत्या वजनाने हैराण झाले आहेत. झपाट्याने वाढणारे वजन तुमचे सौंदर्य तर कमी करतेच पण त्यामुळे अनेक गंभीर आजारही होऊ शकतात. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, लठ्ठपणा असलेल्या लोकांना डायबिटिज, हार्ट डिसिज, स्ट्रोक आणि विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरचा (Diabetes, Heart Disease, Stroke And Cancer) धोका जास्त असतो (Weight Loss Tips).

 

निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगण्यासाठी निरोगी वजन राखणे आवश्यक आहे. व्यायामशाळेत जाणे किंवा निरोगी आहार घेणे वजन कमी करण्यात (Weight Loss) मदत करू शकते. मात्र, असे काही मार्ग आहेत ज्यामध्ये तुम्हाला घाम गाळण्याची गरज नाही किंवा महागडा डाएट प्लान फॉलो करण्याची गरज नाही. होय, जर तुम्हाला जलद वजन कमी करायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक सोपा उपाय घेऊन आलो आहोत (Weight Loss Tips).

 

वजन कमी (Weight Loss) करताना तुम्ही रोज काय खात आहात याची काळजी घेतली पाहिजे. दुसरे म्हणजे, तुमच्या ताटातील खाद्यपदार्थांवर लक्ष ठेवा. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे वजन कमी करण्यास मदत करू शकते. कसे ते जाणून घेऊया –

 

तुमच्या जेवणाच्या ताटावर लक्ष ठेवा (Keep An Eye On Your Dinner Plate)
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की जर तुम्हाला वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर तुम्ही ताटात ठेवलेल्या पदार्थांवर लक्ष ठेवावे. रोजच्या 15 मिनिटांच्या कामाने तुमचे वजन कमी करण्याचे उद्दिष्ट गाठण्याची शक्यता वाढू शकते. यामुळे तुम्ही एका दिवसात काय खाता याकडे लक्ष द्या.

फूड जर्नलिंग का आवश्यक (Why Food Journaling Is Essential)
खाण्यावर लक्ष ठेवण्याला फूड डायरी किंवा फूड जर्नलिंग (Food Diary Or Food Journaling) म्हणतात. यामध्ये तुमचे एका दिवसात जे काही खाणे पिणे आहे ते तारखेसह नमूद केले जाते. हे तुम्हाला कॅलरीजवर लक्ष ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे पुढील दिवसासाठी तुमच्या जेवणाचे नियोजन करणे सोपे होते. तुम्ही काय खाल्ले आहे आणि योग्य ते निवडण्यात यामुळे मदत होऊ शकते. हे तुमच्या खाण्याच्या सवयी समजून घेण्यास आणि त्यावर आधारित तुमचा डाएट चार्ट प्लॅन (Diet Chart Plan) बनविण्यात मदत करते.

 

फूड जर्नलिंगची उपयोग होतो का (Does Food Journaling Work) ?
अनेक अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की वजन कमी करण्याच्या बाबतीत फूड जर्नलिंग चांगले उपयोगी आहे.
ओबेसिटी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, दररोज 15 मिनिटांची ही सवय तुम्हाला वजन कमी करण्यास चमत्कारिकरित्या मदत करू शकते.
सहा महिने खाण्याच्या सवयींचे पालन करणार्‍या 150 लोकांच्या अभ्यासात असे दिसून आले
की ज्यांनी त्यांच्या खाण्याच्या सवयींचे पालन केले त्यांना वजन कमी करण्यास मदत झाली.

फूड जर्नलिंग वजन कमी करण्यात कशी मदत करते (How Food Journaling Helps To Lose Weight)
व्हरमाँट विद्यापीठ आणि साऊथ कॅरोलिना युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञांच्या पथकाने केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे
की ज्या लोकांनी त्यांच्या शरीराचे वजन 10 टक्के कमी केले
ते पहिल्या महिन्यात सरासरी 23 टक्क्यांनी त्यांच्या खाण्याच्या सवयींची नोंद करण्यात सक्षम होते.
सहा महिन्यांच्या शेवटी, सरासरी वेळ 14.6 मिनिटांपर्यंत खाली आला होता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss Tips | researcher of university of south carolina claim 15 minute food journaling can help lose weight

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Herbs For Cholesterol | रक्तवाहिन्यांमध्ये अडकलेले बॅड कोलेस्ट्रॉल 2 दिवसात बाहेर काढतील ‘या’ 8 आयुर्वेदिक वनस्पती

 

HDL Cholesterol | न्यूट्रिशनिस्टने सांगितले शरीरात ’गुड कोलेस्ट्रॉल’ वाढवण्याचे 5 सोपे उपाय, हार्ट अटॅक-स्ट्रोकपासून होईल संरक्षण

 

Curd In Periods | पीरियडच्या काळात दही खावे किंवा नाही?, मुलींनी जाणून घ्यावी ‘ही’ गोष्ट