वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय? सकाळच्या ‘या’ 7 चुका कधी कमी होऊ देणार नाहीत तुमचं वजन; जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – अनेकदा वाढलेले वजन चिंतेचे कारण ठरू शकते. हेच वजन कमी करण्यासाठी विविध प्रयत्नही केले जातात. पण काही केल्या वजन कमी होत नाही. मात्र, तुम्ही सकाळच्या काही गोष्टी टाळल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. आपल्या आहारातील अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वजन वाढण्यास आणि कमी न होण्यास कारणीभूत ठरतात.

…तर आता जाणून घेऊया कोणत्या गोष्टी असू शकतात कारणीभूत…

– सकाळी उठल्यावर पाणी न पिणे. शरीरात पाण्याची कमतरता असल्याने डिहायड्रेट होऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होतो.

– नाष्टा करताना ज्यूस घेत असाल तर पॅकेटमधील घेऊ नका. त्यामध्ये फॅट आणि साखरेचे प्रमाण अधिक असते.

– धावपळीत नाष्टा करू नये. तसे केल्यास नाष्टा पचण्यास अडचण येते

– काही लोक नाष्टा न करताच घरातून बाहेर पडतात. त्यामुळे मेटाबॉलिज्म गती कमी होऊ शकते.

– काही लोक नाष्टा म्हणून बर्गर खातात. पण ते खाणे घातक ठरू शकते.

– डायटमध्ये जास्त कॅलरी स्थूलपणाला प्रोत्साहित करतो.

– सकाळी उठूनही उशीरापर्यंत बिछान्यातच पडून राहणे

– 5 मि.ग्रॅ.पेक्षा जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्यास आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते.