वजन कमी करण्यासाठी जिर्‍याचं करा सेवन, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : बदलत्या जीवशैलीमुळे वजन वाढणे ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक पर्याय व उपाय आहेत. त्यापैकी एक म्हणजे जिऱ्यांचं सेवन करणं.

जिऱ्यामध्ये थायलमोल असतं, यामुळे पचनक्रिया सुधारते . तसेच जिऱ्यामुळे आवश्यक असलेली पोषकतत्त्वे शोषण्यासाठीही शरीराला मदत मिळते. जिरे शरीरातील रक्ताभिसरण चांगले करते शिवाय कोलेस्ट्रॉल कमी करते. जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटते. शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठत नाही. म्हणून नियमित जिऱ्याचं सेवन केल्यास तुमचं वजन नक्कीच नियंत्रणात येईल.

जिऱ्यामधील घटक –

जिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशिअम, कॅल्शियम, फायबर, झिंकची अँटी ऑक्सीडेन्ट जास्त मात्रा असते. याशिवाय जिऱ्यामध्ये अनेक व्हिटॅमीन्स ए आणि सी असतात.

या पद्धतीने करा जिऱ्याचे सेवन –

१) ग्लासभर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्या. नियमितपणे जिऱ्याचा पाण्याचे सेवन केल्याने केल्याने वजन नक्कीच नियंत्रणात येईल.

२) भाजलेले हिंग, जिरे, काळे मिठ आणि पावडर १-३ ग्रॅम समान प्रमाणात करा. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा दह्यासोबत घ्या. त्यामुळे तुमचा लठ्ठपणा कमी होईल.