Weight Loss | जिद्दीच्या ’ट्रेडमिल’वर स्वार होऊन खाणे केले कंट्रोल; डॉक्टरने 2 वर्षात 194 वरून 84 किलो केले वजन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss | हवा को जिद कि उड़ाएगी धूल हर सूरत, हमें धुन है कि आईना साफ करना है. अझहर अदीब यांची ही शायरी काही करण्याबद्दल आणि जिद्दीबद्दल सांगते. काहीशी अशीच जिद्द केली डॉ. अनिरुद्ध दीपक (Dr. Anirudh Deepak) यांनी. अनिरुद्ध चेन्नई येथे राहणारे सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांचे वजन 194.5 किलो होते. अनेक लोक त्यांच्या लठ्ठपणाची (Obesity) खिल्ली उडवत असत. कधी-कधी त्यांना त्रासही होत असे (Weight Loss).

 

मला लहानपणापासून खाण्याची आवड (Loved Eating Since Childhood)
डॉक्टर अनिरुद्ध सांगतात की, त्यांना खाण्यापिण्याची खूप आवड होती. ते लहानपणापासूनच खूप खात-पित असत. त्यामुळे लहानपणीच वजन खूप वाढले होते. ते सांगतात की त्यांना फास्ट फूड खाण्याची खूप आवड होती. पोट भरेपर्यंत ते खात असत. अनिरुद्ध यांचे मित्र अनेक वेळा त्यांची चेष्टा करायचे, पण त्यांनी लक्ष दिले नाही (Weight Loss).

 

इथून सुरू झाली परिवर्तनाची कहाणी (Story Of Change Started From Here)
अनिरुद्ध सांगतात की, लठ्ठपणामुळे होणार्‍या त्रासाकडे किंवा मित्रांच्या चेष्टेकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. जेवणाबाबत कधीही तडजोड केली नाही. 2018 मध्ये त्यांनी एमबीबीएस पूर्ण केले, पण खाण्याचा छंद कायम राहिला.

 

ते सांगतात की एमबीबीएस केल्यानंतर काही काळानंतर त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. उपचारादरम्यान, डॉक्टरांनी सांगितले की, जर तुम्ही तुमची सवय सुधारली नाही तर पुढील 5 वर्षांत तुम्हाला काहीतरी गंभीर आजार होऊ शकतात. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून मी स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचे ठरवले.

 

वर्कआउट सुरू करताना 194.5 किलो वजन (Weight 194.5 kg When Starting Workout)
यानंतर ते फिटनेस कम्युनिटीमध्ये सामील झाले आणि वर्कआऊट करू लागले. ते जॉईन झाले तेव्हा त्यांचे वजन 194.5 किलो होते. ट्रेनरची प्रेरणा, आहार आणि वर्कआउटच्या मदतीने मी 2 वर्षात माझे वजन 110 किलोने कमी केले, असे म्हणतात. आता अनिरुद्ध यांचे वजन जवळपास 84 किलो आहे.

या गोष्टीने वजन कमी करण्यास केली मदत (This Thing Helped To Lose Weight)
डॉ. अनिरुद्ध यांनी सांगितले की, वजन कमी करण्यात डाएटऐवजी क्वांटिफाईड न्यूट्रिशनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते म्हणाले की क्वांटिफाईड न्यूट्रिशन (Quantified Nutrition) म्हणजे तुम्ही किती प्रमाणात खात आहात यावर लक्ष ठेवणे. यासोबतच त्या अन्नातील कॅलरीजच्या प्रमाणाकडेही लक्ष देणे.

 

एवढेच नाही तर प्रोटीन, फॅट, कार्ब (Protein, Fat, Carb) याकडेही लक्ष द्यावे लागते.
ते म्हणतात की वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ध्येय.
या गोष्टीने मला सर्वात जास्त मदत केली आहे. गंतव्यस्थानी पोहोचल्यावरच शेवटचा श्वास घेईन, असे मी ठरवले होते.
या जिद्दीमुळे मी संकल्प कधीही मध्येच सोडला नाही. तुम्हाला आहाराचे चांगले ज्ञान असले पाहिजे आणि व्यायामाच्या पद्धतींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

 

असा होता आहार (It Was The Diet)
डॉ. अनिरुद्ध नाश्त्यात पोहे, उपमा किंवा चपाती घेत असत. याशिवाय ते नाश्त्यात सोया चंक्स,
सलाड वगैरेही घेत असत. त्यांच्या स्नॅक्समध्ये फळे आणि बदामचा समावेश होता
तर दुपारच्या जेवणात भात किंवा भाकरी, डाळ, चना किंवा राजमा असे.
याशिवाय दुपारच्या जेवणात भाजी आणि दहीही घेत असत. संध्याकाळी ते व्हे प्रोटीन घेत असत.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Weight Loss | weight loss doctor inspiring story who loss 110 kg weight in two years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ICAR Recruitment | ICAR भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये 462 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज

 

Pune Crime | एकाच दिवसात 9 जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार दीड तासात हडपसर पोलिसांच्या जाळ्यात

 

Vaani Kapoor Killer Look | कॅज्युअल लुकमध्ये दिसली वाणी कपूर, पैपराझी समोर दिल्या किलर पोज..