Weight Loss | वेगाने कमी होईल वजन ! केवळ रोज सकाळी उठून करा ‘ही’ 2 सोपी कामे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी बहुतेक लोक इंटरनेटवर दिलेल्या माहितीवर अवलंबून असतात. वजन कमी करण्यासाठी, ते डाएट प्लान, पद्धती, एक्सरसाईज (Diet Plan, Methods, Exercise) इत्यादी शोधतात आणि त्यांचे अनुसरण करतात. कोरोना काळापासून (Corona Epidemic) लोकांमध्ये त्यांच्या वाढत्या वजनाबाबत अधिक जागरूकता दिसून येत आहे, त्यामुळे अनेक फिटनेस तज्ञही (Fitness Experts) फिटनेस टिप्स (Fitness Tips) शेअर करत आहेत (Weight Loss).

 

अलीकडेच ब्रिटीश डॉक्टर मायकल मोस्ले Dr. Michael Mosley यांनी वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईजसोबतच आहाराचे महत्त्व सांगितले आहे. यासोबतच त्यांनी असेही सांगितले की, दररोज सकाळी 2 गोष्टी केल्याने वजन झपाट्याने कमी (Weight Loss) होण्यास मदत होते.

 

केवळ व्यायामाने वजन कमी होत नाही : डॉ. मायकेल (Only Exercising Does Not Reduce Weight: Dr. Michael) –
डॉ. मायकेल म्हणाले, मला वाटत नाही की फक्त एक्सरसाईजमुळे वजन कमी होण्यास मदत होईल. एक्सरसाईजने मूड सुधारण्यास मदत होते, यापेक्षा जास्त काही नाही.

 

डेटा दर्शवितो की आहारासोबत एक्सरसाईज केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करताना, प्रत्येकाचे लक्ष फॅट लॉसवर (Fat Loss) असले पाहिजे, वजन कमी करताना मसल्स लॉसवर (Muscle Loss) होऊ नये यासाठी दिवसभरात किमान 50 ग्रॅम चांगल्या दर्जाचे प्रोटीन (Protein) सेवन करा.

या 2 पद्धतीने वेगाने कमी होईल वजन (These 2 Methods Will Reduce Weight Fast)
डॉ. मायकेल मॉस्ले यांनी सांगितले की, ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी रोज सकाळी उठल्यानंतर 2 व्यायाम करावेत. या व्यायामांसाठी तुम्हाला कोणत्याही उपकरणाची गरज नाही आणि कोणीही हे व्यायाम कोणत्याही वयात करू शकतो.

 

तुम्हालाही वजन कमी करायचे असेल, तर त्यासाठी पुश अप्स (Push Ups) किंवा प्रेस अप्स (Press Ups) आणि स्क्वॅट एक्सरसाईज (Squat Exercise) करा. या एक्सरसाईज घरी सहज करता येतात.

 

डॉ. मायकेल मॉस्ले म्हणाले, धावणे, चालणे, पोहणे, सायकल चालवणे (Running, Walking, Swimming, Cycling)
यासारख्या चांगल्या एरोबिक क्रिया हृदय आणि फुफ्फुसासाठी (Heart And Lungs) किती चांगल्या मानल्या जातात हे आपल्या सर्वांना माहीत आहे.
याच्याशिवाय मी दररोज सकाळी या 2 एक्सरसाईज करण्याची शिफारस करतो.
नवीन संशोधनाने हे सिद्ध केले आहे की दररोज ताकदीच्या एक्सरसाईज केल्याने स्नायू (Muscles) आणि मेंदूच्या (Brain) कार्यात सुधारणा होते.

 

पुश अप्स आणि स्क्वॅट्समुळे कमी होते वजन (Push Ups And Squats Will Reduce Weight)
पुश अप एक्सरसाईजमुळे शरीराच्या वरच्या भागाची ताकद वाढण्यास मदत होते आणि स्क्वॅटमुळे खालच्या शरीरासह मन मजबूत होते.
पुश-अप एक्सरसाईज केवळ स्नायूंना टोन करत नाही तर या रेजिस्टन्स ट्रेनिंगमुळे झोप देखील सुधारू शकते.
त्याच वेळी, मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी स्क्वॅट एक्सरसाईज ही एक उत्तम एक्सरसाईज आहे.

 

कधी करावी स्क्वॅट आणि पुश अप एक्सरसाईज (When To Do Squats And Push Up Exercise)
मायकेल मोस्ले यांच्या मते, सकाळी पुश अप्स आणि स्क्वॅट व्यायाम करणे सर्वोत्तम मानले जाते.
मी रोज सकाळी एक्सरसाईज करतो. दररोज सकाळी मी उठतो आणि किमान 40 पुश अप करण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर स्क्वॅट एक्सरसाईज करतो.

 

पुश अप आणि स्क्वॅट्स या अतिशय मूलभूत एक्सरसाईज आहेत, जे कोणीही करू शकतात.
सुरुवातीला 20-20 रिप्सचे 3 सेट करण्याचा प्रयत्न करा आणि नंतर हळूहळू रिप्स आणि सेट वाढवा.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss | weight loss dr michael mosley shares 2 simple things exercise to do every morning to help weight loss

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Patients Diet | डायबिटीजच्या रूग्णांनी करावे ‘या’ 4 गोष्टींचे सेवन, बॅलन्स राहील ‘ब्लड शुगर’

 

Nana Patole On Adv Satish Uke Arrest | सतीश उकेंना ED ने अटक करताच नाना पटोलेंची सावध भूमिका; म्हणाले…

 

Diabetes Symptoms | पायांवर दिसत असतील ‘हे’ संकेत तर करू नका दुर्लक्ष, वाढलेली असू शकते ‘ब्लड शुगर लेव्हल’