Weight Loss | 146 किलोच्या महिलेने कमी केले 82 Kg वजन, केवळ ‘या’ 3 गोष्टींमुळे झाले वेट लॉस!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss | चुकीच्या खाण्याच्या सवयी, चुकीची जीवनशैली, जास्त जंक-फास्ट फूड खाणे, जागरण इत्यादींमुळे वजन वाढू शकते. त्यानंतर वजन वाढल्याचे लक्षात येताच लोक खाणेपिणे सोडून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात (Weight Loss Tips). पण, खरं तर वजन कमी करण्यासाठी खाणे-पिणे सोडण्याची आवश्यकता नाही, तर निरोगी-संतुलित आहार आणि शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे (Weight Loss).

 

अलीकडेच एका 35 वर्षीय महिलेने 82 किलो वजन कमी केले आहे. तिचे वजन कसे वाढले? वजन कमी करण्याचा मार्ग काय होता? ते जाणून घेवूयात (Weight Loss Fat Loss Story Transformation Journey Of Carla Piera Fitzgerald Diet Workout)…

 

वजन कमी करणारी ही महिला कोण (Who Is Weight Loss Woman)?
82 किलो वजन कमी करणार्‍या महिलेचे नाव कार्ला पिएरा फिट्जगेराल्ड (Carla Piera FitzGerald) असून ती 35 वर्षांची आहे. कार्ला डब्लिन, आयर्लंड येथे राहते. काही दिवसांपूर्वी तिने तिचा फिटनेस प्रवास शेअर केला होता. वजन कमी करण्याचा प्रवास शेअर करताना कार्लाने सांगितले होते की, तिचे वजन सुमारे 146 किलो होते.

 

यानंतर तिने खूप मेहनत केली आणि अवघ्या 14 महिन्यांत सुमारे 82 किलो वजन कमी केले. गरोदरपणात तिचे वजन पुन्हा वाढले होते पण तिचे वजन पुन्हा कमी झाले (Weight Loss).

वजनात अशी झाली वाढ (Such An Increase In Weight)
कार्ला म्हणाली, मला 2019 मध्ये समजले की मला माझी जीवनशैली बदलण्याची गरज आहे. खरं तर, मला लहानपणापासून खाण्याची सवय होती आणि या सवयीमुळे माझे वजन खूप वाढले.

 

सुमारे 10 वर्षांपूर्वी, जेव्हा मी माझ्या किशोरवयात होते, तेव्हा मला खाण्याचा विकार होता आणि जेव्हा मी दुःखी होत असे तेव्हा मी खात असे. यामुळे माझ्या कॅलरीजचे प्रमाण लक्षणीय वाढले आणि हळूहळू माझे वजन वाढत गेले. खाण्याच्या या सवयीला इमोशनल इटिंग असेही म्हणता येईल.

 

लठ्ठपणामुळे मला स्वतःची लाज वाटू लागली आणि मग वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा विचारही केला. पण मी शस्त्रक्रिया केली नाही आणि नैसर्गिकरित्या वजन कमी करण्याचा प्लॅन केला.

 

असा सुरू झाला वजन कमी करण्याचा प्रवास (This Is How The Weight Loss Journey Started)
कार्लाच्या म्हणण्यानुसार, तिने तिची खाण्याची सवय बदलण्यासाठी डॉक्टरांना भेटण्याची योजना बनवली. भावनिक खाणे टाळण्यासाठी डॉक्टरांसोबत सेशन्स केले. ज्यामुळे तिला तिच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवण्यास खूप मदत झाली.

 

यानंतर तिने बॉडी स्लिम प्रोग्राममध्ये भाग घेतला. या कार्यक्रमात वजन कमी करण्यासाठी फक्त 3 गोष्टींची काळजी घेतली जाते. त्या 3 गोष्टी म्हणजे मानसिक आरोग्य, व्यायाम आणि आहार. फक्त या 3 गोष्टींनी तिला वजन कमी करण्यास मदत झाली.

यासोबतच कार्लाने तिच्या कॅलरीचे प्रमाण नियंत्रित केले, ज्यामुळे तिचे वजन कमी होण्यास मदत झाली. सुरुवातीला तिने अवघ्या 10 आठवड्यात 19 किलो वजन कमी केले होते. सुरुवातीला इतके वजन कमी केल्याने तिला खूप प्रेरणा मिळाली आणि तिने आपला प्रवास सुरू ठेवला. यासह तिने 2021 पर्यंत आपले एकूण वजन 82 किलोने कमी केले आहे.

 

एप्रिल 2021 मध्ये गरोदर राहिल्याने तिचे वजन पुन्हा वाढू लागले.
यानंतर जेव्हा ती डॉक्टरांना भेटली तेव्हा त्यांनी सांगितले की गरोदरपणात वजन वाढणे सामान्य आहे.
मुलाला जन्म दिल्यानंतर तिने पुन्हा जुनी दिनचर्या सुरू करून पुन्हा पूर्ववत झाली.

 

आहार आणि व्यायामाकडे दिले लक्ष (Focus On Diet And Workout)
कार्लाच्या मते, तिच्या स्वच्छ आणि आरोग्यदायी आहारामुळे तिचे वजन कमी होण्यास मदत झाली.
तिने नेहमीच सक्रिय जीवनशैली ठेवली, ज्यामुळे तिला वजन कमी करण्यात खूप मदत झाली.
वजन कमी करण्यासाठी ती कॅलरी डेफेसिटमध्ये राहात असे. तिचा आहार असा असायचा.

 

नाश्ता : कॉफी

दुपारचे जेवण : ग्रीन सॅलड

रात्रीचे जेवण : व्हेजिटेरियन सॉससह भाजलेले टोमॅटो, पालक आणि फुलकोबी

नाश्ता : पीनट बटर, फळे, सफरचंद

शारीरिक हालचालींबद्दल सांगायचे तर, ती कार कमी वापरायची आणि चालण्यावर जोर देत होती,
ज्यामुळे तिला कॅलरी बर्न करण्यास खूप मदत झाली. याशिवाय वेट लिफ्टिंगचाही तिने दिनक्रमात समावेश केला होता.
पण या गोष्टींचे नियमित पालन केल्याने तिचे वजन कमी होण्यास मदत झाली.

 

Web Title :- Weight Loss | weight loss fat loss story transformation journey of carla piera fitzgerald diet workout

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

हे देखील वाचा

 

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

 

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

 

Diabetes Symptoms | तोंडातील ‘ही’ 2 लक्षणे डायबिटीजचा संकेत, तुम्हाला सुद्धा ‘या’ समस्या जाणवल्या का?