Weight Loss : 10000 पावलं चालल्यानं कमी होईल वजन, जाणून घ्या कसा होईल फायदा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सध्या अनेक लोकांचे वजन असे वाढत आहे की, ते कमी कसे करायचे हा चिंतेचा विषय झाला आहे. वजन वाढल्याने अनेक आजार शरीराला जडतात. अशावेळी मार्गदर्शनाशिवाय मनमानी प्रकारे वजन कमी करण्याचे प्रयत्न केल्यास, ते शरीराला नुकसानकारक ठरू शकते.

10 हजार पावले चालल्याने कमी होईल वजन
आपण जेव्हा कोणतीही क्रिया करतो तेव्हा उर्जेच्या रूपाने कॅलरी बर्न होते. जे जीममध्ये जाऊ शकत नाहीत ते वजन कमी करण्यासाठी 10 हजार पावले चालण्याची एक्सरसाइज करू शकतात. यामुळे खुप वेगाने आपले वाढत असलेले वजन नियंत्रित केले जाऊ शकते.

बर्न होतील 400 कॅलरीज
एक हजार पावले चालल्याने सामान्यपणे 30-40 कॅलरी बर्न होतात, म्हणजे 10 हजार पावले चालल्याने जवळपास 300-400 कॅलरी बर्न होतील.

सहज पूर्ण होईल टास्क
जर तुमचे वजन खुपच जास्त असेल आणि आजारी पडत असाल तर रस्त्यावर किंवा ट्रेडमीलवर 10 हजार पावले चालून वजन कमी करू शकता. आणि जर तुम्ही पूर्णपणे सदृढ असाल आणि वाढणारे वजन कमी करायचे असेल तर चढण किंवा जिन्यावर 10 हजार स्टेप्स चालून तुमचे लक्ष्य प्राप्त करू शकता.