Weight Loss With Eggs | अंड्यासोबत ‘या’ 3 गोष्टींचे कॉम्बिनेशन वेगाने कमी करते वजन, स्वस्त-सोप्या टिप्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss With Eggs | अंडी (Benefits of Eggs) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात भरपूर खनिजे, जीवनसत्त्वे, हेल्दी फॅट आणि प्रोटीन (Minerals, Vitamins, Healthy Fats And Proteins) असते. अंडी वजन कमी करू पाहणार्‍या लोकांच्या आहाराचा एक प्रमुख भाग आहे (Eggs Weight Loss Diet). अंड्यात तीन विशेष गोष्टी मिसळून खाल्ल्याने वजन कमी करण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढवता येतो. अंड्यासोबत या गोष्टींचे मिश्रण काही आठवड्यात अनेक किलोग्रॅम वजन कमी करू शकते (Weight Loss With Eggs).

 

1. अंडी आणि पालक (Egg and Spinach Recipes) –
अंड्यासह पालक सेवन करणे हा वजन जलद कमी करण्याचा सर्वोत्तम फॉर्म्युला आहे. एक कप पालकामध्ये फक्त सात कॅलरीज आणि अनेक पोषक घटक असतात. यात कॅलरीज नगण्य असतात. आयर्न समृद्ध पालक आपली शक्ती आणि मेटाबॉलिज्म (Metabolism) देखील वाढवते. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक द्रव्येही मिळतात आणि दीर्घकाळ भूकही नियंत्रणात राहते (Weight Loss With Eggs).

 

2. अंडी आणि खोबरेल तेल (Eggs And Coconut Oil Recipes) –
बटर किंवा इतर प्रकारच्या तेलात बनवलेले ऑम्लेट खाल्ल्याने शरीराला जास्त कॅलरीज मिळतात. तर खोबरेल तेल मेटाबॉलिज्म 5 टक्के वाढवून वजन कमी करण्यास मदत करते.

 

30 लोकांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की एका महिन्यासाठी दररोज दोन चमचे खोबरेल तेल खाल्ल्याने त्यांच्या कंबरेचा आकार 1.1 इंच कमी झाला. वजन कमी करायचे असेल तर तेल किंवा बटरऐवजी पुढच्या वेळी खोबरेल तेलात ऑम्लेट बनवा.

3. अंडी आणि ओटमील (Eggs And Oatmeal Diet) –
अंडी ओटमील मिसळून खाल्ल्यास पोटाची चरबी (Belly Fat) सहज कमी करता येते. ओटमील अंड्यासोबत खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वाढते.

 

अंडे हे न्यूट्रिशनचे पॉवर हाऊस (Eggs : Powerhouse Of Nutrition)
अंडे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता सहजपणे पूर्ण करू शकते. एका अंड्यामध्ये 75 कॅलरीज असतात. त्यात 7 ग्रॅम उच्च दर्जाचे प्रोटीन असतात. याशिवाय एक अंडे खाल्ल्याने शरीराला 5 ग्रॅम फॅट, 1.6 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट आणि आयर्न, व्हिटॅमिन, खनिजे आणि कॅरोटीनोइड्स मिळते. म्हणूनच याला पोषणाचे न्यूट्रिशनचे पॉवर हाऊस  (Eggs Nutrition Value) म्हणतात.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Weight Loss With Eggs | egg combination with spinach or coconut oil can quickly lose your weight
 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sharad Pawar On Raj Thackeray | ‘एखादं लेक्चर देतात अन् 3-4 महिने भूमिगत होतात’, शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला

 

Pune Crime | IPL च्या सामन्यावर सट्टा घेणाऱ्या हिस्ट्रीशीटरसह तिघांना अटक, 25 लाखांची रोकड जप्त; पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची कारवाई

 

Raj Thackeray on Ajit Pawar | राज ठाकरेंचे अजित पवारांवर टीकास्त्र; म्हणाले – ‘पळून कुणासोबत गेले आणि लग्न कुणासोबत केलं?’