वाढत्या वजनामुळे चिंतेत आहात ? तर योगासनं करा अन् राहा फिट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाढते वजन ही समस्या अनेकांना सतावत असते. त्यामुळे बहुतांश जण चिंतेत असतात. पण असे काही योगा आहेत ते तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतात. योगा एक्सपर्टने वजन कमी करण्यासाठी काही विशेष बाबी सांगितल्या आहेत. त्यामुळे वजन नियंत्रित करण्यास फायद्याचे होऊ शकते.

नियमितपणे योगासन करुन वजन कमी करणे हा एक बेस्ट फॉर्म्युला आहे. यामध्ये महाक्रिया, पवनमुक्त आसन आणि नौकासन ही योगासने वाढत्या वजनावर प्रभावी ठरू शकते. तसेच सकाळी योगासने करण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर निघतात. ज्या लोकांचे वजन जास्त आहे, त्यांनी दर अर्ध्या तासानंतर गरम पाणी प्यावे.

महाक्रिया, पवनमुक्त आसन आणि नौकासन फायद्याचे
वजन कमी करण्यासाठी योगासने महत्वाची असतात. या योगासनांमुळे शरीरातील अवयवांची हालचाल होते आणि त्यामुळे शरीराला याचा मोठा फायदा होतो. योगासनांमध्ये महाक्रिया, पवनमुक्त आसन आणि नौकासन ही योगासने महत्त्वाची आहेत.

योगासनापूर्वी हे करा अन् राहा फिट
– सकाळी एक ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते

– दर अर्ध्या तासाला गरम पाणी प्यावे

– सायंकाळी तेलकट पदार्थ खाणं टाळावे