Weight Loss Without Gym Diet Plan | जिममध्ये न जाता असे कमी करा 5 ते 7 किलो वजन, वेट लॉससाठी खा ‘या’ 6 गोष्टी, वेगाने कमी होईल वजन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss Without Gym Diet Plan | आज जगभरात लठ्ठपणा (Obesity) ही एक मोठी समस्या म्हणून उदयास येत आहे. लठ्ठपणा आटोक्यात आणण्यासाठी लोक विविध उपायांचा अवलंब करतात, तसेच आहारावर नियंत्रण (Dietary Control) ठेवतात, तरीही हट्टी लठ्ठपणापासून सुटका होत नाही. खराब जीवनशैली (Bad Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयी (Eating Habits) लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत आहेत. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवायचे असेल तर सर्वप्रथम आहारात बदल (Weight Loss Without Gym Diet Plan) करणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी कोणत्या 6 वस्तू खाव्यात ते जाणून घेवूयात (Let’s Know Which 6 Foods Should Be Eaten To Lose Weight)…

 

1. लिंबू डिटॉक्स वॉटर – Lemon Detox Water
लिंबू (Lemon) व्हिटॅमिन सीचा (Vitamin C) समृद्ध स्त्रोत आहे, ते स्ट्रोकचा धोका (Risk Of Stroke) कमी करतो, पचन सुधारते आणि हृदयाचे आरोग्य (Heart Health) मजबूत करते. दररोज लिंबू पाण्याचे सेवन केल्यास वजन झपाट्याने कमी होण्यास मदत (Weight Loss Without Gym Diet Plan) होते.

 

2. नट आणि बिया – Nuts And Seeds
लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण वगळणे ही योग्य सवय नाही. त्याऐवजी तुम्ही थोडे काजू खाऊ शकता. भरपूर फायबर (Fiber), प्रोटीन (Protein), हेल्दी फॅट (Healthy Fats), व्हिटॅमिन (Vitamins) आणि मिनरल (Mineral), असलेला सुकामेवा जास्त काळ पोट भरलेले ठेवतो आणि त्यामुळे तुमचे वजन कमी करण्यात आणि पोटाची फॅट बर्न होण्यास मदत होते.

3. फळे – Fruit
पोट रात्रभर हलके ठेवायचे असेल तर हलके जेवण खाणे आवश्यक आहे, सफरचंद (Apple) सारख्या फळांमध्ये हेल्दी फ्लेव्होनॉइड्स (Healthy Flavonoids) आणि फायबर असतात जे बेली फॅट बर्न (Fat Burn) करण्यास मदत करतात. त्यामुळे पोटात बदल पाहायचा असेल तर ताजी फळे खावीत.

 

4. ओट्स – Oats
उन्हाळ्यात नाश्त्यात ओट्सचा समावेश करा. यामुळे तुमच्या शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून निघेल आणि अन्नही सहज पचन होईल. दही (Curd), चना डाळ (Gram), उडीद डाळ, गाजर (Carrot) आणि ओट्स (Oats) मिक्स करून सेवन करूशकता. यामुळे ऊर्जा मिळते पण वजन वाढण्यापासून रोखते. नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करून तुमचे शरीर निरोगी आणि मजबूत बनवा.

 

5. एवोकॅडो – Avocados
एवोकॅडो हेल्दी फॅट्सने भरलेले असतात, जे नाश्त्यात खाऊन वजन नियंत्रित करण्याचा उत्तम मार्ग आहे.
त्यामध्ये फायबर आणि ओलेइक अ‍ॅसिड (Oleic Acid) दोन्ही असतात,
जे उपासमार कमी करण्यास मदत करतात आणि आपण आपल्या नाश्त्यामध्ये सहजपणे एवोकॅडोचा समावेश करू शकता.
टोस्टवर (Toast) एवोकॅडो टाकून किंवा स्मूदीमध्ये (Smoothie) घालून सेवन करू शकता ज्यामुळे क्रीमी चव निर्माण होते.

6. स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी – Strawberries, Raspberries, Blueberries
स्ट्रॉबेरी, रास्पबेरी आणि ब्लूबेरी सारख्या फळांमध्ये खूप कमी कॅलरीज असतात. ती फायबरने भरलेली असतात.
सकाळच्या न्याहारीसोबत याचे सेवन केल्याने दुपारच्या जेवणापर्यंत पोट भरल्यासारखे वाटेल.
संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक जास्त अँटिऑक्सिडेंट खातात ते वजन नियंत्रित करू शकतात.
स्मूदीमध्ये बेरी घालू शकता किंवा ओट्समध्ये मिसळून खाऊ शकता.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Weight Loss Without Gym Diet Plan | weight loss 5 to 7 kg without gym diet plan for fast weight loss

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Heat Wave Illnesses | उन्हाळ्याच्या हंगामात खुप सामान्य आहेत आरोग्याशी संबंधीत ‘या’ 5 समस्या, जाणून घ्या याची लक्षणे

To Remove Bad Smell | शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या

Immune System In Summer | ‘हे’ 5 फूड उन्हाळ्यात इम्युनिटी करू शकतात कमजोर, डाएटमधून आजच काढा बाहेर; जाणून घ्या