नवी दिल्ली : Weight Loss Woman | महिला आणि पुरुषांचे शरीर अंतरबाह्य दोन्ही प्रकारे वेगवेगळे आहे. ज्यामुळे दोन्ही शरीर प्रत्येक गोष्टीत वेगळे रिस्पॉन्ड करते. इतके की एकाच प्रकारचे डाएट आणि एक्सरसाईज केल्यानंतर सुद्धा दोघांच्या वेट लॉसमध्ये सुद्धा खुप फरक असतो.(Weight Loss Woman)
एनसीबीआयमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, ५८ पैकी १० स्टडीमध्ये या गोष्टीला दुजोरा मिळाला की, महिलांसाठी वजन कमी करणे पुरुषांच्या तुलनेत जास्त अवघड असते. यामागील कारण म्हणजे मेटाबॉलिक आणि हार्मोनल आहे, जे महिला आणि पुरुषांमध्ये एकमेकांपेक्षाा वेगळे असते.
यासाठी महिलांना सोपे नाही वजन कमी करणे –
शरीराची निर्मिती
साधारणपणे, महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त प्रमाणात चरबीचे प्रमाण असते. आणि मांसपेशीचे प्रमाण कमी असते. यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया संथ होते.
लठ्ठपणासंबंधी आजार (Obesity Related Diseases)
थायरॉईड, पीसीओएससारख्या मेडिकल कंडीशन लठ्ठपणाशी संबंधित असतात. कारण याचा धोका पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त असतो, यासाठी या आजाराने ग्रस्त महिला लवकर वेट लॉस करू शकत नाहीत.
क्रेविंग आणि भूक
प्रोसीडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित २००९ च्या एका अभ्यासानुसार, महिलांच्या
तुलनेत पुरुषांमध्ये आपली भूक आणि क्रेविंग दाबण्याची क्षमता थोडी जास्त असते.
प्रेग्नंसी (Pregnancy)
ज्या महिलांचे गरोदरपणात वजन अतिशय वाढते, त्यांना २१ वर्षानंतर जास्त वजन अथवा लठ्ठपणा होण्याची शक्यता अन्य
महिलांच्या तुलनेत अनेकपटीने वाढते. परंतु प्रेग्नंसी आणि तिच्या एक वर्षापर्यंत नॉर्मलपेक्षा जास्त वजन असणे वेगळी गोष्ट आहे.
सेक्स हार्मोन (Sex Hormones)
एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन सारखी सेक्स हार्मोन शरीराच्या संरचनेत एक मोठी भूमिका पार पाडतात.
महिलांमध्ये एस्ट्रोजन मुख्य हार्मोन असते. अशावेळी कमी अथवा जास्त लेव्हल लठ्ठपणा,
भूकेची लालसा आणि इन्सुलिन संवेदनशीलतेला नकारात्मक प्रकारे प्रभावित करते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा