Flashback 2019 : ‘या’ पक्षांनी भाजपला दिली ‘सोडचिठ्ठी’ तर ‘या’ पक्षांनी केला BJP शी ‘घरोबा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या वर्षी देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. लोकसभेदरम्यान विविध पक्षांतील नेत्यांनी आपले पक्ष सोडून भाजपशी नाते जोडले, तर एनडीएतील पक्ष भाजपवर नाराज होते. एनडीएतील सर्वात जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने देखील भाजपची साथ विधानसभेच्या निवडणूकीनंतर सोडली आणि राष्ट्रवादी, काँग्रेस बरोबर आपले सूत जुळवले. एनडीएतील असे अनेक मित्र पक्ष होते ज्यांनी भाजपशी फारकत घेत एनडीएतून बाहेर पडणे पसंत केले.

भाजप शिवसेनेच्या मैत्रीत दुरावा –
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा यावरुन भाजप शिवसेना युतीत थिनगी पडली. त्यानंतर 30 वर्षाच्या जुन्या नात्यात दुरावा आला. भाजप शिवसेनेची युती 1989 पासून सुरु झाली होती. शिवसेनेने 1995 च्या विधानसभा निवडणूकीत युतीच्या हिंमतीवर मोठे यश मिळवले. या मैत्रीत जो पर्यंत दुरावा नव्हता तो पर्यंत शिवसेना छोटा भाऊ या भूमिकेत वावरत होती आणि तेव्हा शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे जीवंत होते. परंतु त्यांच्या जाण्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक बदल झाले. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत युतीने मोठे यश मिळवले परंतु मुख्यमंत्रिपदावर वाद सुरु झाला आणि मैत्रीत फूट पडली. शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणा केली. आणि भाजपला चेतावनी देत सांगितले की आतापर्यंत शिवसेनेची मैत्री पाहिली आता शत्रूत्व पहा.

निवडणूकीपूर्वीच भाजपशी काडीमोड –
सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे नेते ओम प्रकाश राजभर यांनी लोकसभेच्या निवडणूकीत एनडीएशी काडीमोड घेतला. त्यांनी मोदी सरकारवर शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप लावला. त्यांची इच्छा होती की भाजपकडून लोकसभेच्या निवडणूकीत त्यांच्या पक्षाला जास्त जागा सोडण्यात याव्या. परंतु भाजपने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि ओमप्रकाश राजभर यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला.
सुहेलदेव भारतीय समाज पार्टी ही मूळची उत्तर प्रदेशच्या पूर्वांचलपर्यंत मर्यादित पार्टी आहे. अपना दल नंतर सुभासपा हा पक्ष एनडीएमध्ये महत्वाची भूमिका बजावत होता. या दोन्ही पक्षांना सोबत घेऊन भाजपने 2014 मध्ये उत्तर प्रदेशात 73 जागांवर विजय मिळवला एवढेच नाही तर 2017 मध्ये विधानसभेत सत्ता देखील काबीज केली.

कुशवाह यांनी सोडली एनडीएची साथ –

लोकसभा निवडणूकीपूर्वी बिहारमअये एनडीएतील राष्ट्रीय लोक समता पार्टीने देखील पंतप्रधान मोदींची साथ सोडली. उपेंद्र कुशवाहा यांच्या रालोसपाने 2014 साली लोकसभा निवडणूकीत एनडीएबरोबर निवडणूक लढली होती. परंतु 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणूकीत एनडीएला रामराम ठोकला. असे समजले जाते की बिहारच्या राजकारणात एनडीएमध्ये नीतीश कुमार जोडल्या गेल्याने कुशवाहा एनडीएमध्ये स्वत:ला असुरक्षित समजत होते. 2014 मध्ये लोकसभा निवडणूकीत मोदींची साथ देत कुशवाहा यांच्या पक्षाने 3 जागांवर विजय मिळला. तर 2019 च्या निवडणूकीत पक्षाला यश आले नाही.

आजसूचा देखील राम राम –
झारखंड विधानसभा निवडणूकीच्या अगदी पहिले ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियनने एनडीएतून वेगळे होते आपला वेगळा मार्ग पकडला. आजसूकडून भाजपकडे जागांची मागणी वाढत होती. त्यामुळे दोघांत दुरावा आला. मागील विधानसभा आजसू भाजपबरोबर लढले होते. त्यात आजसूला 8 पैकी 5 जागा मिळल्या. त्यानंतर आजसूने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली.

BJP-JJP ने एकत्र बनवले सरकार –
हरियाणा विधानसभा निवडणूकीत भाजपने अबकी बार 75 पारचा नारा दिला होता परंतु त्यात भाजप अपयशी ठरली. परंतु त्यानंतर भाजपने दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपी बरोबर जाऊन सत्तेवर दावा केला. जेपेपी सारखी 319 दिवसांचा नवा पक्षाने विधानसभेत 90 पैकी 10 जागावर विजय मिळाला. त्यानंतर दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री बनले. तर भाजपने 40 जागांवर विजय मिळवत भाजपचे मनोहर लाल खट्टर पुन्हा मुख्यमंत्री झाले.
तसे पाहिले तर दोन्ही पक्षांची वोट बँक वेगवेगळी आहे. अजेंडा देखील वेगळा आहे आणि विचारधारा वेगळी आहे. असे असले तरी त्यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/