अ‍ॅड. धनराज वंजारी यांचे भद्रावतीत जल्लोषात स्वागत

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन –  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा ओबीसींचे नेते अ‍ॅड.धनराज वंजारी यांचे येथील वंचित बहुजन आघाडी व संताजी स्नेही मंडळातर्फे येथील पेट्रोल पंप चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे.या मागणी करीता अ‍ॅड.धनराज वंजारी संपूर्ण महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत.चंद्रपूर येथील ओबीसी मेळाव्याला उपस्थित राहण्याकरीता जात असताना त्यांचे भद्रावतीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी त्यांच्यासोबत प्रा. रमेश पिसे,संजय हेडाऊ, मंगलमूर्ती सोनकुसरे, अ‍ॅड.साभारे उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अ‍ॅड.वंजारी म्हणाले की,ओबीसींना आरक्षण मिळू नये अशी शासनाची नीती आहे.ओबीसी आणि एस.सी.-एस.टी. बांधवांचे आरक्षण रद्द करत चालले आहे. आता मराठा आरक्षणाचा आड घेऊन मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडणं लावण्याचा प्रकार हे शासन करीत आहे.या भांडणातून उद्या कोणालाच आरक्षण नाही असेही हे सरकार म्हणू शकते. हे सर्व षडयंत्र वंचित बहुजन आघाडी हाणून पाडेल.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव कुशल मेश्राम, तालुका प्रमुख विजय इंगोले, नगरसेवक सुनील खोब्रागडे, सुशील देवगडे,राखी रामटेके,सीमा ढेंगळे, कपुरदास दुपारे, संध्या पेटकर,संताजी स्नेही मंडळाचे अध्यक्ष रमेश गाटे, वसंत लोणकर,दादाजी चन्ने, प्रशांत झाडे,आनंद वाढई, लता टिपले,पवन गौरकार,कविता गौरकार,ग्यानी चहांदे, विशाल कांबळे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.