दुर्देवी ! विहीरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू

जाफराबाद : पोलीसनामा ऑनलाइन – येथील एका तरुण शेतकऱ्याचा विहीरीतील विद्युत मोटारीचे काम करण्यासाठी उतरताना विहीरीत पडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. समाधान जोशी (वय २१) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

मंगळवारी (२२ डिसेंबर) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. बोरगाव बु. येथील समाधान जोशी हे त्यांच्या शेतातील विहीरीतील विद्युत मोटारीचा पंप दुरुस्ती करण्यासाठी विहीरीत खाली उतरत होते. तेव्हा विहीरीत पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. सी. खिल्लारे यांनी पंचनामा केला. त्यानंतर जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयात बुधवारी (२३ डिसेंबर) सकाळी अकराच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले.