अहमदनगर : कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जी.के.एन.समूहाच्या मदतीने इसळक-निंबळक च्या उजाड माळरानावर वंचितांसाठी सुसज्ज पुनर्वसन संकुल, जलकुंभ, पैठणी साडी प्रशिक्षण केंद्र, कृषी प्रशिक्षण केंद्र असे उपक्रम यशस्वी करून दाखविले. स्नेहालयाच्या कार्यशैलीत झळकणारी जबाबदारी आणि निःस्वार्थ सेवेची जाणीव जी.के.एन समूहाकरिता भूषणीय बाब असल्याचे प्रतिपादन जी.के.एन सिंटर मेटल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उज्वल भट्टाचार्य यांनी केले .

वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर बाहेर पडणाऱ्या वंचित-अनाथ-निराधार बालकांसाठी साकारलेल्या समूह घराच्या ५वा टप्प्याचे लोकार्पण आणि नोकरी प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहालयचे सचिव श्री.राजीव गुजर यांनी केले. जी.के.एनने स्नेहालयवर दाखविलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू. वृक्ष लागवड,कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था,उद्यानाची निर्मिती, ही प्रमुख आव्हाने असली तरी पुढील दोन वर्षात आम्ही ती लोकसहभागातून पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी जी.के.एनच्या प्रतिनिधीना दिले.

स्नेहालय आणि अनामप्रेम च्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले. यावेळी जी.के.एनच्या पिंपरी आणि अहमदनगर प्रकल्पाचे प्रमुख मा.राजेश मिराणी, मा. संग्रामजी कदम,एच.आर.मॅनेजर अहमदनगर व मा. सुधीरजी पोळ तसेच पुरुषोत्तम ऋषी, सचिन असोले, सिद्धार्थ मित्रा, रवीस शंकर, अहमदनगर वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष श्री.कैलास नेहूल,जनरल सेक्रेटरी मिलिंद जपे व इतर सर्व पदाधिकारी, स्नेहालयचे पालक मिलिंद कुलकर्णी, जयकुमार मुनोत, विश्वस्त बेहरामजी नगरवाला, फिरोज तांबटकर, आर्किटेक सौ. रसिका व श्री.प्रसाद बडवे, गणेश आव्हाड, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

समारोप प्रसंगी स्नेहालयचे अध्यक्ष संजय गुगळे म्हणाले कि निसर्गाची काळजी घेऊन ही वास्तू निर्माण झाली आहे. नैसर्गिक संसाधने वापरल्याने ती पुर्णत: इको फ्रेंडली असल्याचे त्यांनी सांगितले. जी.के.एन समूहाची हार्दिक कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रम यश्वस्वी करण्यासाठी महेश मरकड, अशोक अकोलकर,कावेरी रोहोकले, संजय खरात, अमोल गोरे यांनी खूप मेहनत घेतली. सूत्रसंचालन वरिष्ठ सहसंचालक अनिल गावडे यांनी केले.

आरोग्य विषयक वृत्त –

क्रिम्सने नव्हे, व्हिटॅमिन्समुळे स्ट्रेच मार्क्स होतात नाहीसे

बडीशेपचे पाणी प्या, उन्हापासून सहज हाईल बचाव

अशी घ्या मुलांच्या मौखिक आरोग्याची काळजी

स्वाईन फ्लूसाठी नवी औषधे द्या, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राकडे मागणी

You might also like