4000 कोटीच्या कंपनीच्या मालकीणीनं केला कर्मचार्‍यांसह ‘मुकाबला’ गाण्यावर ‘भन्नाट’ डान्स, पाहा ‘व्हायरल’ व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेलस्पन इंडियाच्या सीईओ दीपाली गोयनका आपल्या ऑफिस कर्मचार्‍यांसह उत्साहाने डान्स करताना दिसल्या. दीपाली यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचे बरेच कौतुक केले जात आहे. मंगळवारी समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये वेलस्पन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहव्यवस्थापकीय संचालक ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ चित्रपटाच्या ‘मुकाबला’ या गाण्यावर नाचताना दिसल्या. त्यांच्यासोबत सर्व कर्मचारीही थिरकताना दिसले. व्हिडिओच्या शेवटी, कर्मचारी टाळ्या वाजवत आहेत.

ट्विटरवर आतापर्यंत हा व्हिडिओ 1 लाखाहून अधिक वेळा पाहिलेला आहे. लोक या व्हिडिओद्वारे कार्यालयात आनंदाचे वातावरण दर्शवितात असे म्हणत कौतुक करीत आहेत.

दीपाली यांनीही हा व्हिडीओ रीट्वीट करत लिहिले की, “शेअर केल्याबद्दल धन्यवाद हर्ष गोयनका. मला तुझे काम करण्याचे ठिकाण देखील पहायला आवडेल.” त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहेत. लोक म्हणत आहेत की प्रत्येक कार्यालयात अश्याच प्रकारचे वातावरण असले पाहिजे. एका वापरकर्त्याने लिहिले की, “अशा प्रकारची युनिटी कार्यालयाचे वातावरण हलके राहते आणि लोक योग्यप्रकारे कार्य करण्यास सक्षम असतात.” ट्विटरवर लोकांनी भरभरून याचे कौतुक केले आहे.

You might also like