West Bengal Rape Case | BJP कार्यकर्त्याच्या पत्नीवर 6 जणांकडून सामूहिक बलात्कार, प्रचंड खळबळ

पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था – West Bengal Rape Case । पश्चिम बंगाल राज्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तेथील एका 34 वर्षीय महिलेवर तिच्याच घरात 6 जणांनी बलात्कार (West Bengal Rape Case) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर, ही महिला भाजपा (BJP) कार्यकर्त्याची पत्नी असल्याचे म्हटलं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्या आरोपींमधील 2 तृणमुल काँग्रेस पक्षाचे (TMC) कार्यकर्ते असल्याची माहीती समोर आली आहे. 6 आरोपींपैकी शेख सय्यद (Shaikh Syed) आणि जोयनाल मुल्लिक (Joynal Mullik) या दोघांना पोलिसांकडून (Police) अटक करण्यात आली आहे.

अधिक माहीती अशी की, रविवारी रात्रीच्या दरम्यान महिला आपल्या घऱी एकटी होत्या. त्यावेळी आरोपी घरात घुसले. आणि महिलेचे हात, पाय बांधून तिच्यावर बलात्कार (Rape) केला. काही दिवसापुर्वी त्या महिलेला मेंदूघाताचा झटका आला होता. म्हणून महिलेला बोलताना त्रास होत असल्या कारणाने त्यांना मदतीसाठी आवाज देता आला नाही. ही घटना घडताना महिलेचा पती कामानिमित्त बाहेर होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी कुटुंबाने महिलेला उपचार सुरु असणाऱ्या रुग्णालयात नेले. मात्र, घटनेवरुन राजकारण तापलं आहे. दरम्यान, TMC सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बलात्कारासारख्या (Rape) गुन्ह्यांना पाठबळ देत असल्याचा आरोप भाजपाने (BJP) केलाय.

Jobs | देशातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, उघडल्या जाणार अनेक शाखा

दरम्यान, पोलिसांनी (Police) प्रांरभी महिलेची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. प्रकरण दडपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. TMC विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बलात्काराचा राजकीय साधन म्हणून वापर करत आहे, असा गंभीर आरोप भाजपाचे (BJP) आयटी सेल प्रमुख अमित मालविया (Amit Malvia) यांनी केलाय. सोमवारी संध्याकाळपर्यंत वैद्यकीय तपासणी झाली नव्हती. महिला लेखी स्वरुपात बलात्कार (Rape) झाल्याचं सांगत असताना देखील डॉक्टर वैद्यकीय तपासणी करण्यास तयार नसलेल्या राज्यात काय स्थिती असेल याचा विचार करा. नंतर त्यांनी केली पण दबावापोटी बलात्काराच्या जखमा नसल्याचं सांगत होते, असा आरोप देखील भाजपा आमदार अग्निमित्र पॉल (BJP MLA Agnimitra Paul) यांनी केलाय.

या दरम्यान, दुसरीकडे आपण पीडित कुटुंबासोबत असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी असं TMC
ने म्हटलं आहे. गुन्हेगारांना कोणताही धर्म, जात नसते असं TMC चे हावडा जिल्हाध्यक्ष पुलक रॉय
म्हणाले आहेत. तसेच, 6 आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केलीय. आरोपींमध्ये TMC चे ब्लॉक अध्यक्ष कुतुबुद्दीन (Qutbuddin) आणि स्थानिक कार्यकर्त्याचा समावेश आहे. याशिवाय रहमत अली आणि महबूल हे 2 आरोपी आहेत.

हे देखील वाचा

Gold Price Today | खुशखबर ! मागील 2 दिवसात सोनं 1700 रूपयांनी झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

LPG Connection | आता देशभरात एका नंबरवर कॉल करताच मिळेल LPG कनेक्शन, मिस्ड कॉल करून मिळवा सिलेंडर, जाणून घ्या प्रोसेस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  West Bangal Rape Case | woman gangraped by six men tmc workers among accused

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update