दाट धुक्यामुळे डंपर कारवर उलटला; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यु

जलपायगुडी : पश्चिम बंगालच्या (West Bengal) जलपायगुडी येथे रात्री एक भीषण अपघात झाला. त्यात १३ जणांचा मृत्यु झाला. जलपायगुडी जिल्ह्यातील धुपगुरी शहरात हा अपघात झाला आहे. दाट धुक्यामुळे अनेक गाड्या एकामेकावर धडकल्या. धुपगुरी शहरात दाट धुक्यामुळे काही वाहने एकामेकांवर धडकली होती. त्याचवेळी एक खडी भरलेला डंपर येत होता. त्याच्या चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी या डंपरच्या शेजारुन उलट्या बाजूने एक कार जात होती. डंपरने पुढच्या वाहनाला धडक दिल्याने तो उलटला व त्यातील सर्व खडी कडेला असलेल्या कारवर कोसळली. त्यात कारमधील सर्व जण या खडीखाली गाडले गेले. तसेच याच भागात गाड्या एकमेकांना धडकल्यामुळे अनेक जण जखमी झाले आहे. या सर्व प्रकारात एकूण १३ जणांचा मृत्यु झाला असून १८ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.