West Bengal Elections 2021 : प्रशांत किशोर म्हणाले – ‘बंगालला आपलीच मुलगी हवीये, भाजप जिंकला तर…’

कोलकाता : वृत्तसंस्था – आसाम, तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या तारखांची घोषणा काल (शुक्रवार) करण्यात आली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी 8 टप्प्यात मतदान होणार आहे. 2 मेला या निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. यादरम्यान निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी ट्विट करत यावर भाष्य केले.

प्रशांत किशोर यांनी केलेल्या ट्विटमध्ये दावा केला, की ‘जर भाजपला बंगालमध्ये यश मिळाले तर मी ट्विटर वापरणेच बंद करेन. मीडियाचा एक वर्ग भाजपच्या समर्थनासाठी वातावरण निर्मिती करत आहे. त्यामुळे हे स्पष्ट होते, की भाजप दुहेरी आकड्यासाठी संघर्ष करत आहे. जर भाजपला बंगालमध्ये चांगले यश मिळाले तर मी ट्विटर वापरणेच बंद करेन.

तसेच शनिवारी केलेल्या ट्विटमध्ये प्रशांत किशोर यांनी म्हटले, की भारतात लोकशाहीची महत्वपूर्ण लढाई पश्चिम बंगालमध्ये लढवण्यात येणार आहे. बंगालचे लोक त्यांच्या संदेशसह तयार आहेत. बंगाल फक्त त्यांच्या मुलीलाच पसंत करते. त्यामुळे 2 मेला माझे पूर्वीचे ट्विट नक्की पाहा.

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांत मतदान
पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामध्ये पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल हा असेल. तर तिसरा टप्प्यात 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल हा असणार आहे. याशिवाय पाचवा टप्पा 17 एप्रिल, सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिल आणि शेवटचा आठवा टप्पा 29 एप्रिल हा असणार आहे. याचदरम्यान पश्चिम बंगालमध्ये मतदान घेतले जाणार आहे. तर याचा निकाल 2 मेला जाहीर केला जाणार आहे.