पश्चिम बंगाल निवडणूक : आघाडी करून अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नात ‘काँग्रेस-लेफ्ट’ !

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची जरी औपचारिक घोषणा झालेली नसली तरी राजकीय पक्षांनी आपल्या सक्रियतेने राज्यातील राजकीय वातावरण तापवले आहे. बंगालच्या सत्तेवर तीन दशकांपासून काँग्रेस आणि सुमारे साडेतीन दशकापर्यंत डाव्या पक्षांचे राजकीय वर्चस्व कायम राहिले आहे. परंतु, राज्याच्या बदललेल्या राजकीय स्थितीत दोन्ही पक्षांच्या समोर राजकीय अस्तित्व वाचवण्याचे आव्हान आहे.

काँग्रेस 1977 च्या निवडणुकीत सत्तेबाहेर गेली ती आजपर्यंत परत आलेली नाही. तर डावे पक्ष मागील दहा वर्षांपासून राजकीय वनवासात आहेत. अशावेळी बंगालच्या राजकीय रणधुमाळीत भाजपा आणि टीएमसीमध्ये एकवटलेल्या निवडणुकीला त्रिकोणी बनवण्यासाठी काँग्रेस आणि डाव्यांनी आघाडी केली आहे. पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेतील संसदीय दलाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी गुरुवारी घोषणा केली की, काँग्रेस आणि वाम मोर्चा मिळून पश्चिम बंगालची निवडणूक लढवतील. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आघाडीसाठी हिरवा झेंडा दाखवला आहे.

2016 मध्ये सुद्धा सोबत होते काँग्रेस-लेफ्ट
पश्चिम बंगाल 2016 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि लेफ्टने एकत्र निवडणूक लढवली होती. परंतु, तरीसुद्धा ममता बॅनर्जी यांच्यासमोर काही खास आव्हान उभे करू शकले नव्हते. मात्र, तेव्हा काँग्रेस विधानसभेत दुसरी मोठी पार्टी म्हणून समोर आली होती आणि पार्टीने 44 जागांवर विजय मिळवला होता, तर सीपीएमला 26 आणि इतर लेफ्टच्या घटक पक्षांना काही जागा मिळाल्या होत्या. भाजपाला अवघ्या 3 जागा जिंकला आल्या होत्या.

मागील पाच वर्षात पश्चिम बंगालची राजकीय स्थिती खुप बदलली आहे. सध्याच्या काही आमदारांनी पक्ष बदलल्याने काँग्रेसकडे सध्या 23 आमदार शिल्लक राहिले आहेत. बंगालमध्ये भाजपाच्या जबरदस्त राजकीय मुसंडीमुळे काँग्रेस आणि लेफ्ट दोघांसमोर आपआपले राजकीय आधार वाचवण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

याच राजकीय नाईलाजाने पुन्हा एकदा दोघांना एकत्र यावे लागले आहे. बंगालमध्ये काँग्रेस आणि डावे एकत्र येण्याचा थेट अर्थ दोघांना आपले अस्तित्व टिकवायचे आहे, कारण राज्यात राजकीय लढाई भाजपा आणि टीएमसीमध्ये असल्याचे दिसत आहे.

डाऊन झाला ग्राफ
2016 च्या विधानसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा आलेख खाली आला आहे. तर भाजपाची राजकीय ताकद वाढली आहे. पंचायत निवडणुका असोत की, 2019 च्या विधानसभा निवडणूका, भाजपा राज्यात दुसर्‍या नंबरचा पक्ष म्हणून समोर आला आहे. लोकसभेत भाजपा 18 जागा आणि 40 टक्के मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर, काँग्रेस अवघ्या 2 जागा आणि 5.67 टक्के मते मिळवू शकली आहे. तर डाव्यांना 6.34 टक्के मते मिळाली, परंतु एक सुद्धा जागा जिंकता आली नव्हती.

याच कारणामुळे काँग्रेस आणि डाव्यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांना हे चांगले माहित आहे की, जर टीएमसी किंवा भाजपापैकी कुणीही सत्तेत आले तर बंगालवरील त्यांची राजकीय पकड आणखी कमजोर होईल आणि सत्तेत परतण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहील.