सगळ्यांच्या घरी ‘आया-बहिणी’ आहेत हे लक्षात ठेवा ! अभिनेत्री TMC उमेदवार कौशानी बॅनर्जी धमकावत मागतेय Vote (व्हिडीओ)

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाइन – तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार कौशानी मुखर्जीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात मुखर्जी यांनी वादग्रस्त विधान केल्याचा दावा करत टीका केली जात आहे. दरम्यान व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये भाजपच्या आयटी सेलने नीच राजकारण करत छेडछाड केल्याचा आरोप कौशानी यांनी केला आहे. व्हिडीओत कौशानी असे म्हणाताना दिसून येत आहे की, घरी माता-भगिनी असेल तर मत देण्याआधी एकदा विचार करा. त्यांचे हे वक्तव्य अर्धवट दाखवले जात असून त्यातून चुकीचा अर्थ काढला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दोनच महिन्यांपूर्वीच कौशानी मुखर्जी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सध्या त्या कृष्णानगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. कौशानी यांनी फेसबुकवर मूळ व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्या मतदारसंघात प्रचार करताना दिसत आहेत. तसेच त्या मतदारांना म्हणतात की, तुमच्या घरी माता-भगिनी असतील तर भाजपला मतदान करण्याआधी दोन वेळा विचार करा. दीदींच्या बंगालमध्ये महिला सुरक्षित आहेत. जर तुम्हाला वाटत असेल भाजप सरकार असलेल्या उत्तर प्रदेशातील हाथरससारख्या घटना बंगालमध्ये होऊ नयेत तर भाजपला मत देऊ नका. कौशानी यांच्यावर भाजप नेत्या रूपा भट्टाचार्य यांनी एका पोस्टमधून निशाणा साधला आहे. तुमच्या या वक्तव्याने सर्वांना लाज वाटत असून मान खाली गेली आहे. तर तृणमूल काँग्रेसच्या मंत्री शशी पांजा यांनी कौशानी यांची बाजू घेत भाजपने व्हिडीओमध्ये छेडछाड केली आहे. त्यांनी संपूर्ण व्हिडीओ दाखवलेला नसल्याचे म्हटले आहे.