West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जी यांना झालेली दुखापत बंगाल निवडणुकीवर किती परिणाम करू शकते ?

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप आहे की नंदीग्राममध्ये चार-पाच माणसांनी त्यांच्यावर केलेल्या हल्ल्यात त्यांना दुखापत झाली आहे. मात्र, सध्या हे स्पष्ट झालेली नाही की हा हल्ला होता की अपघात? ममता यांच्या राजकीय विरोधकांनी दावा केला आहे की, ममता यांच्यावर हल्ला झालेला नाही, मात्र याचा शेवटचा निर्णय तपास गट करेल, परंतु आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या घटनेचा काय अर्थ आहे? पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा)मध्ये एका भयंकर आणि जीवघेण्या स्पर्धेच्या दरम्यान हे प्रकरण आणि बॅनर्जी यांच्या हॉस्पीटलमधील छायाचित्रे निर्णयाक सिद्धा होऊ शकतील का?

याच विषयावर दीदी आणि द अनटोल्ड ममता बनर्जी चे लेखक शुतापा पॉल आणि मिशन बंगाल : ए सॅफ्रन एक्स्प्रीमेंटचे लेखक, पत्रकार स्निग्धेंदु भट्टाचार्य यांच्याशी न्यूज 18 ने केलेल्या चर्चेतील काही अंश येथे वाचा…

या घटनेचा जमीनीवर परिणाम होईल?
पॉल यांचे म्हणणे आहे की, या घटनेचा बंगालच्या लोकांवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे जे सामान्य प्रकारे भावुक आहेत, तर भट्टाचार्य यांना ही सहानुभूती निवडणुकीच्या लाभात बदलेल असे वाटत नाही.

पॉल : ममता बॅनर्जी आणि जमीनीवरील लोकांमध्ये खुप काही आहे. अशाप्रकारची घटना एक गंभीर प्रकार आहे. प्रकरणाचा तपास करत असलेल्या टीमने शोध घेतला पाहिजे की, योग्य सुरक्षा का नव्हती जेव्हा मुख्यमंत्री निवडणुक अभियानावर होत्या. मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचणे सोपे नाही.

भट्टाचार्य : आतापर्यंत असे वाटते की, लोकांचे खुप जास्त ध्रुवीकरण झाले आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी अगोदरच ठरवले आहे की, कुणाला वोट द्यायचे आहे. शुवेन्दु अधिकारी यांचे समर्थक म्हणत आहेत की, ममताने नंदीग्रामच्या जमीनीवर षडयंत्राचा आरोप करत तिचा अपमान केला आहे.

स्ट्रीट फाइटर ममता
या घटनेतून आणखी एक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, ममता एक स्ट्रीट फायटर आहेत आणि त्या आव्हानांचा सामना करण्यास घाबरत नाहीत. बुधवारी नंदीग्रामच्या घटनेने 16 ऑगस्ट 1990 ची आठवण करून दिली जेव्हा भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) च्या कार्यकर्त्यांनी ममता यांच्या डोक्यात काठ्या मारल्या होत्या. पॉल यांचे म्हणणे आहे की, नंदीग्राम (2016 मध्ये सीट जिंकणार्‍या) मधून बॅनर्जी यांचा निवडणूक लढण्याचा निर्णय सुद्धा एक प्रतिकात्मक आणि आश्चर्यकारक आहे. जो हा संदेश देतो की, कोणतेही राजकीय आव्हान दीदीच्या समोर मोठे नाही, कारण ती लोकप्रीय आहे.