WB Elections : ममता यांच्या लिस्टमध्ये 42 मुस्लिम, 50 महिला; दीदींनी बॅलन्स केले धर्म आणि जातीचे समीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपले पत्ते उघडले आहेत. ममतांनी बंगालच्या राजकीय रणांगणात उतरणाऱ्या सर्व सरदारांची नावे जाहीर केली आहेत. बंगालच्या २९४ जागांमध्ये टीएमसी २९१ जागांसाठी निवडणूक लढवणार आहे. ज्यामध्ये तीन जागा मित्रपक्ष गोरखा मुक्ती मोर्चासाठी सोडण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर टीएमसीने आपल्या २७ आमदारांचे तिकीट काढून घेतले आहे, त्यामध्ये अशा आमदारांचा समावेश आहे जे पार्टीला सोडून बीजेपीसोबत गेले आहेत. अशा स्थितीत ममतांनी तिकिटाच्या माध्यमातून राजकीय खेळी खेळल्या आहेत.

ममता बॅनर्जी यांनी २९१ जागांसाठी ज्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, त्यामध्ये ५० तिकिटे महिला उमेदवारांसाठी देऊन बंगालच्या अर्ध्या लोकसंख्येला राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच नाही तर ज्याप्रकारे ममता बॅनर्जी यांनी ४२ मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले आहे त्यावरून असे वाटते की, यामागेही राजकीय रणनीती आहे. बंगालमध्ये ३०% मुस्लिम मतदार आहेत. जे १०० पेक्षा अधिक विधानसभा जागांचा विजय आणि पराभव करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात.

बंगालमध्ये ममता दलित आणि अनुसूचित जातींवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. ७९ दलित उमेदवारांना तर १७ अनुसूचित जातीतील उमेदवारांना तिकीट देण्यामागील हेच मुख्य कारण आहे. बंगालमध्ये एकूण लोकसंख्येच्या ३०% लोकसंख्या दलित आणि अनुसूचित जमातींची आहे. जे राजकीयदृष्ट्या महत्वाचे मानले जाते. अशा परिस्थिती ममतांनी या दोन्ही जातींच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने आणून भाजपला टक्कर देण्याची राजकीय डावपेज आखले आहेत.

ममतांनी आपली भवानीपूर येथील परंपरागत जागा सोडली आहे. या जागेवर त्यांनी त्यांच्या जवळचे सोवनदेव चटर्जी याना संधी दिली आहे. त्यातच ममता या स्वतः नंदीग्राम जागेवर उभ्या राहणार आहेत. यासोबतच ममतांनी असे सांगितले की, ८० वर्षाहून अधिक वय असणाऱ्यांना तिकीट मिळणार नाही. ममतांनी या वेळेच्या निवडणुकीत आपल्या सोबत असणाऱ्या २७ आमदारांचे तिकीट काढून घेतले आहे. त्यांच्या जागेवर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

बांकुरामधून फिल्मस्टार सायंतिका, उत्तरपाडामधून कांचन मलिक, शिबपूर येथून क्रिकेटर मनोज तिवारी यांना तिकीट दिले आहे. सिंगर अदिती मुन्शी यांना राजरहाट, चंद्रीमा भट्टाचार्य यांना नॉर्थ दमदम येथून तिकीट देण्यात आले आहे. वरिष्ठ टीएमसी नेता मदन मित्र यांना कमरहाटी, मंत्री शशी पांजा यांना शामपुकूर येथून तिकीट मिळाले आहे. अर्थ मंत्री अमित मित्रा तबियत बिघडल्यामुळे निवडणूक लढवू शकणार नाहीत. त्याचवेळी पार्था चटर्जी यांना तिकीट दिले नाही.