यशवंत सिन्हा यांचा मोदी-शहांवर हल्लाबोल; म्हणाले – ‘… तर राजीनामा देणार का?’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आयाराम – गयारामांची संख्या देखील वाढू लागली आहे. दरम्यान, अटल सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परदेश मंत्री म्हणून जबाबदारी हाताळणारे यशवंत सिन्हा यांनी भाजपचा राजीनामा दिल्यापासून राजकारणात दीर्घकाळ ते सक्रिय नव्हते, नुकतेच त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

सिन्हा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. बंगालच्या निवडणूक प्रचारात ज्या प्रकारे मोदी -शहा उतरलेत… त्यानंतरही जर भाजपचा प्रभाव झाला तर स्वाभिमान राखून त्यांनी राजीनामा दयायला हवा. मी प्रतिष्ठा नसलेल्या लोकांकडून जरा जास्तच अपेक्षा ठेवतोय हे मला माहीत आहे असे म्हणत त्यांनी टीका केली आहे.

यापूर्वीही सिन्हा यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांच्यावर जो हल्ला झाला. तो टिपिंग पॉईंट होता. त्यावेळीच तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा आणि ममतांना समर्थन देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटलं आहे. एवढेच नाही तर त्यांनी भाजपवरही हल्लबोल केला होता. भाजपचा अटल बिहारी वाजपेयींच्या काळात सर्वसाधारण सहमतीवर विश्वास होता. मात्र आह परिस्थिती बदलली आहे. सध्या सरकारचा केवळ दडपशाही आणि जिंकण्यावर विश्वास आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे भाजपमधून अकाली दल, बीजेडी वेगळे झाले आहेत. त्यामुळे भाजपसोबत कोण उभ आहे अशा शब्दात त्यांनी भाजपावर निशाणा साधला होता.

यशवंत सिन्हा हे आयएएसची नोकरी सोडून राजकारणात दाखल झाले होते. चंद्रशेखर सरकारमध्येही ते मंत्री होते. अटल बिहारी वाजपेयींच्या जवळचे नेते म्हणून ते परिचित आहेत. त्यांनी वेळोवेळी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा वेगळी असल्याचं मत व्यक्त केलं. यशवंत सिन्हा यांनी अनेकदा मोदींच्या आर्थिक धोरणांसहीत परराष्ट्र धोरणांवरही उघडपणे टीका केली होती. विशेष म्हणजे यशवंत सिन्हा यांचा मुलगा जयंत सिन्हा हे भाजपाचे खासदार आहेत.