बंगाल निवडणुकीपूर्वी TMC सोडण्याची स्पर्धा ? आज 5 आमदार भाजपामध्ये दाखल

कोलकाता : वृत्तसंस्था – विधानसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये राजकीय उलथा-पालथीचे सत्र सुरू आहे. ममता बनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते भाजपात दाखल झाले आहेत. आता टीएमसीला आणखी एक झटका बसला आहे, त्यांचे 5 आमदार भाजपामध्ये दाखल झाले. टीएमसी आमदार सोनाली गुहा, दीपेंदु बिस्वास, रवींद्रनाथ भट्टाचार्य, जटू लहिरी आणि हबीबपुरच्या टीएमसी नगरसवेक सरला मुर्मू सोमवारी भाजपात दाखल झाले. पश्चिम बंगाल भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष, भाजपा नेते शुभेंदु अधिकारी आणि मुकुल रॉय यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला.

मागील सुमारे तीन महिन्यांपासून टीएमसीच्या गोटात खळबळ उडाली आहे. एका पाठोपाठ एक दिग्गज भाजपामध्ये दाखल होत आहेत. तृणमूल काँग्रेसचे मोठे नेते लागोपाठ पक्ष सोडत आहेत. डायमंड हार्बर आमदार दीपक हलदर, माजी मंत्री शुभेंदु अधिकारी आणि राजीव बनर्जी, टॉलीवुड अभिनेता यश दासगुप्ता, हीरन चटर्जी यांच्यासह सुमारे अर्धा डझन अभिनेते भाजपामध्ये सहभागी झाले आहेत. याशिवाय आणखी काही नेते पक्ष सोडण्याची सतत धमकी देत आहेत.

तृणमूल काँग्रेसची यादी
टीएमसी यावेळी 294 पैकी 291 जागांवर निवडणूक लढणार आहे. तीन जागा मित्रपक्ष गोरखा जनमुक्ती मोर्चाला दिल्या आहेत. यावेळच्या यादीत आनेक हैराण करणारे आकडे समोर आले आहेत. उदाहरणार्थ यावेळी 50 महिला उमेदवारांना तिकिट देण्यात आले आहे. परंतु आता याची संख्या कमी होऊन 49 झाली आहे. याशिवाय या यादीत मुस्लिम उमेदवारांची संख्या कमी आहे.

महत्वाचा महिलांचा मुद्दा
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक जवळ आल्याने महिलांच्या मुद्द्यावर जोर वाढत चालला आहे. सत्तारूढ तृणमूल काँग्रेस यावेळी सर्वाधिक 50 महिला उमेदवारांना मैदानात उतरवणार आहे, मात्र भाजपाने या दरम्यान आरोप केला आहे की, ममता बनर्जी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार, गुन्हे वाढले आहेत.