पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक : TMC ने जाहीर केली 291 उमेदवारांची यादी, नंदीग्राममधून निवडणूक लढविणार ममता बॅनर्जी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   6 राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. यातच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने 291 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 291 उमेदवारांत पक्षाने 100 नवीन चेहऱ्याना संधी दिली आहे. यात 50 महिला, 42 मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे. यासह मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यंदाही नंदीग्राम विधानसभा संघातून निवडणूक लढविणार आहे. तर उत्तर बंगालच्या 3 जागांवर टीएमसीने आपले उमेदवार उतरविले नाही.

यावेळी सरकार आल्यास विधानपरिषदेची केली जाणार स्थापना – ममता बॅनर्जी

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, सोव्हनदेव चट्टोपाध्याय आगामी विधानसभा निवडणुकीत भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवतील. त्यांनी म्हंटले कि, यावेळी आम्ही विधान परिषद बनवू. या निवडणुकीत जे हरवले आहेत त्यांना पुन्हा विधान परिषदेत आणले जाईल. बॅनर्जी म्हणाले की, आज आम्ही 294 जागांपैकी 291 जागा जाहीर केल्या आहेत. दार्जिलिंग, कॅलिंपोंग आणि कुरसेओंग या तीन जागांवर आमचे मित्रपक्ष निवडणूक लढवतील.

8 टप्प्यात होणार निवडणूका

पश्चिम बंगालमध्ये यावेळी 8 टप्प्यात मतदान होईल. 294 जागांच्या विधानसभेसाठी 27 मार्च (30 जागा), 1 एप्रिल (30 जागा), 6 एप्रिल (31 जागा), 10 एप्रिल (44 जागा), 17 एप्रिल (45 जागा), 22 एप्रिल (43 जागा), 26 एप्रिल (36 जागा) 29 एप्रिलला (35 जागा) मतदान होईल. 2 मे रोजीच पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे.

भाजपसोबत जबरदस्त टक्कर

ममता बॅनर्जी गेल्या 10 वर्षांपासून बंगालवर राज्य करत आहेत, पण ही पहिलीच वेळ आहे , जेव्हा त्यांना कोणत्या पक्षाकडून जबरदस्त आव्हान मिळत आहे. भाजपाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी ममता महाशिवरात्रीच्या दिवशी आपला अर्ज दाखल करु शकतात. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याच्या घोषणेनंतर नंदीग्राम नक्कीच सर्वात व्हीआयपी जागा बनली आहे. येथूनच निश्चित होईल कि, बंगालचे राजकारण पुढे कोणत्या बाजूने वळण घेईल. या जागेवर विद्यमान आमदार शुभेंद्रू अधिकारी आहेत. आता शुभेंदू स्वत: ममतांच्या विरोधात उभे राहतील कि, भाजपा इतर कोणाला उमेदवार बनवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.