ममता बॅनर्जींना आणखीन एक मोठा झटका ! हजारो समर्थकांसह तृणमूल नेत्यांचा BJP मध्ये ‘एन्ट्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपच्या योजनेत आसाम, पुदुच्चेरी, केरळ, तामिळनाडू या राज्यांतल्या निवडणुका महत्त्वाच्या नाहीत. मात्र सध्या भाजपचा सगळा जोर तृणमूल काँग्रेसच्या ताब्यातून पश्चिम बंगाल हिसकावून घेण्यावर दिसतो आहे. दोन मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांतील मतदान पार पडलं आहे. भाजपच्या प्रवासात हा निकाल अनेक अर्थाने नवे पर्व सुरू करील, असे मानले जाते. सध्या पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Election 2021) सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपमध्ये गेले आहेत. अशातच ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

मात्र अजूनही पक्ष बदलणं सुरूच आहे. शुक्रवारी बंगालच्या अलीपूरदार जिल्ह्यात गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान हजारो समर्थकांसह तृणमूलच्या (TMC) एका नेत्याने भाजपात (BJP) प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते मोहन शर्मा (Mohan Sharma) आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत भाजपामध्ये दाखल झाले आहेत. मोहन शर्मा हे तृणमूल काँग्रेसचे जुने नेते आहेत. त्यांनी पक्षासाठी अलीपूरदार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. तसेच ते अलीपूरदार जिल्हा परिषदेचे सल्लागारही होते. अमित शहांच्या उपस्थितीत मोहन शर्मा यांच्यासहीत तृणमूलच्या हजारो कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपच्या सेंट्रल कमिटीचे महासचिव अरविंद मेनन यांनी मोहन शर्मा यांच्या हाती पक्षाचा झेंडा सोपवला. मोहन शर्मा यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे तृणमूलचं खूप मोठं राजकीय नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण मोहन शर्मा यांची अलीपूरदार जिल्ह्यात चांगलीच पकड असल्याचं म्हटलं जातं.

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या देशाच्या राजकारणाच्या भविष्याची दिशा स्पष्ट करणार आहेत. खासकरुन पश्चिम बंगाल आणि आसाम,केरळ आणि तामिळनाडूत काय होईल याचा अंदाज आपण मांडू शकतो. पण आसाममध्ये माझ्या माहितीप्रमाणे भाजपाचं राज्य असलं तरी काँग्रेस तगडी फाईट देत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल हे चित्र स्पष्ट दिसत आहे. यामुळे या निकालांनंतरच देशाचं राजकारण कोणत्या दिशेने जात आहे आणि विरोधी पक्षांच्या आघाड्या स्थापन होऊन ते कोणती भूमिका घेत आहेत हे स्पष्ट होईल” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालच्या २९४ जागांसाठी आठ टप्प्यांत मतदान होणार आहे. २७ मार्च आणि १ एप्रिल रोजी अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलं. तिसऱ्या टप्प्यातील ३१ जागांसाठी ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावर्षी भाजपा आणि तृणमूलमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut ) यांनी देशातील चार राज्यांच्या निवडणुका या देशाच्या राजकारणाच्या भविष्याची दिशा ठरवणार आहेत. खासकरून पश्चिम बंगाल आणि आसाम असं म्हटलं आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Assembly Elections 2021) भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल हे चित्र स्पष्ट दिसत आहे असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. यासोबतच लॉकडाऊन किंवा कोरोनाचं राजकारण करु नये असं देखील त्यांनी म्हटलं आहे.