CAA चा विरोध करणारे ‘कलाकार’ ममता बॅनर्जीचे कुत्रे : भाजप खासदार सौमित्र खान (व्हिडीओ)

कोलकत्ता : वृत्तसंस्था – सध्या देशभरात CAA विरोधात निषेध नोंदविण्यात येत आहे. पश्चिम बंगाल मध्ये CAA आणि NCR चा विरोध मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. या कायद्याचा विरोध करण्यासाठी पश्चिम बंगालमधील अभिनेते, दिग्दर्शक आणि संगितकार हे देखील पुढे आले आहेत. यांनी दोन्ही कायद्यांचा निषेध करत पश्चिम बंगाल सरकारला एकप्रकारे पाठिंबाच दिला आहे. या कायद्याला विरोध करत निषेध करणाऱ्या कलाकरांचा विष्णूपूर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार सौमित्र खान यांनी चांगलाच समाचार घेतला असून या कायद्याला विरोध करणाऱ्या कलाकारांच्या बाबतीत वादग्रस्त विधान केले आहे.

सौमित्र खान यांनी सांगितले की, ज्यांनी याच्या निषेधात भाग घेतला आहे, त्यांना एनआरसी आणी सीएएशी संबंधी माहिती आहे. तरी देखील ते याचा निषेध करत आहेत. निषेध करणारे ममता बॅनर्जी यांचे श्वान आहेत. जे लोक आज सीएएबद्दल निषेध करीत आहेत तेच लोक पार्क स्ट्रिटमधील कामदुनी येथील सामूहिक बलात्कारावर काहीच बोलत नाहीत. ते गप्प का आहेत, असे म्हणत त्यांनी सीएए विरोधात निषेध करणाऱ्या कलाकारांचा समाचार घेत वादग्रस्त विधान केले आहे. सौमित्र खान हे पूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये होते. त्यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सौमित्र खान यांच्या आधी दिलीप घोष यांचे वादग्रस्त विधान
सौमित्र खान यांच्या वादग्रस्त विधानापूर्वी पश्चिम बंगालचे भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी वादग्रस्त विधान केले आहे. रविवारी एका कार्यक्रमात घोष यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सरकार प्रस्तावीत CAA कायद्याची अंमलबजावणी करण्यास सरकार वचनबद्ध आहे. तसेच सरकारने राज्यात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशातील 50 लाख मुसलमानांना परत पाठवावे असे म्हणत त्यांनी सत्तेत आल्यास सार्वजनिक मालमत्तेला हानी पोहचवणाऱ्यांना गोळ्या घालीन, असे वादग्रस्त विधान घोष यांनी केले आहे.

घोष यांचा गंभीर आरोप
घोष यांनी रविवारी झालेल्या कार्यक्रमात वादग्रस्त विधान करताना गंभीर आरोप केले आहेत. राज्यात अवैधरित्या राहात असलेले बांगालादेशी मुस्लिम जाळपोळ आणि हिंसाचारामध्ये सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. धर्माच्या नावाखील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारा विरोधाला माझा पाठिंबा आहे, असे म्हटले तरी मला फरक पडत नाही. आम्ही 50 मुस्लिम घुसखोरांची ओळख पटवू आणि गरज पडल्यास त्यांना राज्यातून पळवून लावू, असे देखील घोष यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like