भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘जबर’ हिंसाचार ; आत्‍तापर्यंत 5 जणांचा मृत्यू

कोलकत्ता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये भाजप व तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात चार भाजप कार्यकर्त्यांचा तर एका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे तृणमूल काँग्रेसने रॅली काढली होती.

या रॅलीच्या वेळी अचानक गोळीबार झाला. या गोळीबाराचे पर्यवसन हिंसाचारात झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे.हिंसाचारात चार भाजपा कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येसाठी तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप भाजपाचे नेते मुकुल रॉय यांनी केला आहे.

मुकुल रॉय म्हणाले आहेत की , ‘ भाजपाच्या खासदारांचे दल घटनास्थळाला भेट देणार असून, त्यासंदर्भातील अहवाल गृहमंत्र्यांना दिला जाईल. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री दहशतीचे राज्य फैलावत आहेत. याविषयी आम्ही गृहमंत्री अमित शहा, भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय आणि राज्यातील अन्य नेत्यांना कल्पना दिली आहे.’

मिळालेल्या माहितीनुसार , कोलकातापासून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या संदेशखाली येथे तृणमूल काँग्रेसने विजयी रॅली काढली होती. पक्षाचा झेंडा लावण्याच्या किरकोळ कारणावरून भाजपा आणि तृणमुल काँग्रेस यांच्यात वाद झाला तसेच या रॅलीत अचानक गोळीबार झाला.

या गोळीबारानंतर तृणमूल व भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हिंसाचार झाला. या हिंसाचारात चार भाजप कार्यकर्ते व एका तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. सुकंता मोंडल, प्रदीप मोंडल, तपन मोंडल, देबदास मोंडल अशी मृत्युमुखी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांची नावे आहेत. तर कुय्यम मोल्लाह असे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे नाव आहे.

तृणमूल काँग्रेसचा आरोप-

दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने आरोप केला आहे की तृणमूलच्या सार्वजनिक बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी प्रवेश करून गोळीबार केला त्यात एका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

हवेच्या प्रदुषणामुळे ही होतो अनियमित मासिक पाळीचा त्रास

फूड पॉयझनिंगवर ‘हे’ आहेत साधेसोपे रामबाण उपाय

अशी घ्या मुलांच्या मौखिक आरोग्याची काळजी

धक्कादायक ! कुपोषणामुळे ४ वर्षांत ९ हजार बालकांचा मृत्यू