मिशनरी शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थीनींना चक्क काढायला लावल्या ‘लेगिंग्स’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – एका इंग्लिश मिडियममध्ये मिशनरी शाळेत जूनियर सेक्शनच्या काही विद्यार्थींनीना लेगिंग्स काढण्यास भाग पाडल्याचा कथित प्रकार घडला आहे. लेगिंग्स काढायला लावण्याचे कारण त्यांच्या लेगिंग्सचा रंग शाळेच्या यूनिफॉर्मशी जुळता नव्हता. हे प्रकरण पश्चिम बंगालच्या बोलपूरचे आहे.

ही घटना सोमवारी घडली. या घटनेने संतापलेल्या पालकांना मंगळवारी सकाळी शाळेच्या बाहेर जोरदार गोंधळ घातला. यानंतर ही घटना समोर आली. पालकांना आरोप लावला की पाच ते नऊ वर्षांच्या मुलांनी थंडीचे दिवस सुरु असल्याने शाळेच्या ड्रेस बरोबर लेगिंग्स घातली होती. एका विद्यार्थीनीच्या पालकांनी सांगितले की, जेव्हा माझी मुलगी सोमवारी दुपारी घरी आली तेव्हा तिने लेगिंग्स घातली नव्हती, ती म्हणाली की शिक्षकांनी त्यांचे लेगिंग्स काढले.

एका विद्यार्थीनीच्या वडीलांनी सांगितले की मी ऐकले होते की मुख्यधापकांनी शिक्षकांना असे करण्याचे आदेश दिले होते. ते म्हणाले की माझी मुलगी मागील दोन वर्षापासून थंडीत शाळेत जाताना लेगिंग्स घालून जात आहे. पालकांनी या प्रकरणानंतर अजूनही पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही, पालकांनी सांगितले की शाळेच्या मुख्यधापकांनी माफी मागितली आहे.

शाळेच्या मुख्यधापकांनी म्हणजेच अर्चना फर्नांडीज यांनी कारवाईपासून बचाव करण्यासाठी सांगितले की या विद्यार्थ्यांना लेगिंग जबददस्तीने काढण्याची घटना नव्हती, विद्यार्थींना फक्त लेगिंग्स जमा करण्यासाठी सांगण्यात आले होते. कारण ते शाळेच्या यूनिफॉर्मला अनुरुप नाहीत.

शाळेच्या एका वरिष्ठ शिक्षक जहीर अली मोंडल यांनी सांगितले की, शाळेचा युनिफॉर्म आहे परंतू विद्यार्थांनीनी जे लेगिंग्स घातल्या होत्या ते त्याच्या अनुरुप नाहीत. त्यांनी फक्त विद्यार्थींनीना लेगिंग्स बदलण्यास सांगितले होते. कोणीही त्यांना जबदस्तीने लेगिंग्स काढण्यास सांगितले नाही.

कोलकत्यात पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री पार्थ चटर्जी यांनी सांगितले की आम्हाला ही घटना ऐकून वाईट वाटले. ते म्हणाले की जिल्हा शिक्षण विभागने शाळेच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला आहे. ते म्हणाले की अहवाल मिळाल्यानंतर ते कठोर पावले उचलतील. आम्ही ICSE बोर्डाबरोबर चर्चा देखील करु.

Visit :  Policenama.com