CBI चे तृणमुलच्या युवा काँग्रेसच्या सरचिटणीसाच्या कार्यालयावर छापे

कोलकता : जनावरांच्या तस्करीच्या कथित प्रकरणात सीबीआयने कोलकातामध्ये विविध ठिकाणी छापा टाकले़ तृणमूल युवा काँग्रेसचे सरचिटणीस विनय मिश्रा(General Secretary Vinay Mishra) याच्या कार्यालयावरही छापे टाकण्यात आले आहेत. मिश्रा हे फरार असल्याचे समजताच सीबीआयने (CBI) त्यांच्या कार्यालयावर नोटीस बजावली आहे.

पश्चिम बंगालमध्ये नव्या वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत. आपणच तृणमूलला टक्कर देऊ शकतो, असा प्रयत्न भाजपाने सुरु केला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील नेत्यांविरुद्ध ईडी, सीबीआय चौकशीचे शुक्लकाष्ठ लावून दिले जात आहे. त्यावर सर्वच क्षेत्रातून टिका होऊ लागली आहे.

तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आतापासूनच निवडणुक प्रचाराला तोंड फुटले आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. भाजप कोणत्याही निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद अशा सर्व प्रकारचा उपयोग करत असते. त्यामुळे पश्चिम बंगालची निवडणुक जिंकण्यासाठी भाजपाने सर्व हातगंडे वापरण्यास सुरुवात केली असल्याची टिका सुरु झाली आहे.

सीबीआयने आज टाकलेल्या छाप्यांवर तृणमूल काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार सीबीआयचा राजकारणासाठी वापर करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

विनय मिश्रा हे २०१४ पासून तृणमूल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत. विशेष: म्हणजे त्यांनी ३ डिसेंबर रोजी शेवटचे रिट्विट केले होते ते कंगना राणावत हिच्या विरोधातील होते.