भाजपशी सामना करणाऱ्या ममता बॅनर्जींना करावा लागणार आता डाँक्टरांशी ‘सामना’

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये भाजपशी सामना केल्यानंतर आता ममता बॅनर्जींना डॉक्टरांच्या संपाचा सामना करावा लागत आहे. पश्चिम बंगाल मध्ये संपावर गेलेल्या डॉक्टरांना ममता बँनर्जींनी सेवेत पुन्हा रुजू होण्यासाठी 4 तासाचा अल्टीमेटम दिला होता. मात्र डॉक्टर आता लढा देण्याचा तयारीत आहे.

ममता बॅनर्जींच्या अल्टीमेटम नंतर सागर दत्ता हॉस्पिटल मधील 3 असिस्टेंट प्रोफेसर, एक प्रोफेसर आणि चार डॉक्टर यांनी राजीनामा दिला आहे. आता जुनिअर डॉक्टर यांना वरिष्ठ डॉक्टरांचा पाठिंबा मिळाला आहे. या संपामुळे बंगालमधील आरोग्य योजना कोलमडून पडल्या आहेत. रुग्णांना देखील मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

मंगळवारी एक रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी एका इंटर्न डॉक्टरांना मारहाण करण्यात आली होती, डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर नाराज डॉक्टरांनी बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून कामबंद संपाला सुरुवात केली. त्यामुळे डॉक्टरांची कमतरता असल्याने अनेक रुग्णाला त्रासाला समोरे जावे लागत आहे.

सरकारी हॉस्पीटलच्या संपात खासगी डॉक्टरांनी देखील सहभाग घेतला आहे. नातेवाईकांनी डॉक्टरांना केलेल्या मारहाणीत डॉक्टरांना गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत पोलिसांत तक्रार केल्यास पोलिसांनी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीत बाबत कोणतीही दखल घेतली नाही, डॉक्टरांची मागणी आहे की त्यांना सुरक्षा देण्यात यावी, ज्यामुळे मारहाणी सारख्या प्रकारावर नियंत्रण ठेवता येईल.

ममता बॅनर्जींनी दिलेल्या अल्टीमेटम नंतर डॉक्टरांनाकडून तो नाकराण्यात येऊन राजीनाम्याचे अस्त्र काढले आहे. एकीकडे ममतांना भाजपशी सामना करावा लागत असताना आता डॉक्टरांचा सामना ममतांना करावा लागणार आहे.

सिने जगत –

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका धक्‍कादायक वळणावर ; ‘चालतय की’ म्हणणारा राणा’दा’ ची ‘एक्झिट’

‘बेबी डॉल’ सनी लिओनी सुरू करणार ‘हा’ नवा ‘उद्योग’ !

#Video : ‘हे’ बॉलिवूडचे सुपरस्टार मिडिया समोर लपवितात ‘चेहरा’

सलमान पेक्षा 9 वर्षाने लहान असलेली अभिनेत्री चित्रपटात त्याची ‘आई’ ; ट्रोलिंग सुरू, ट्रोलर्सना दिले ‘असे’ उत्‍तर

Loading...
You might also like