मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बनवला रस्त्यावरील टपरीतच चहा (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा एक अनोखा अंदाज पहायला मिळाला. दत्तपूर गावात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका चहाच्या स्टॉलवर चहा बनवला. एवढेच नाही तर हा चहा त्यांनी अनेकांना प्यायला दिला. त्यांच्या हा अनोखा अंदाज असलेला व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये त्या छोट्या मुलीशी खेळताना देखील दिसून आल्या.

हा व्हिडिओ त्यांनी ट्विटवर शेअर देखील केला आहे, त्यात त्यांनी लिहिले आहे की, कधी कधी आयुष्यात आपल्याला छोटे क्षण देखील आनंद देऊन जातात. चांगला चहा बनवणं आणि तो लोकांना पाजणं हे त्यातीलच एक. यावेळी त्यांनी उपस्थित लोकांशी चर्चा देखील केली.

त्यांच्या चहा बनण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेक जण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. काहीनी त्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न देखील केला. या व्हिडिओत ममता बॅनर्जी एका मुलीशी खेळताना दिसत आहेत, त्यांनी पहिल्यांदा त्या मुलीला जवळ घेतले आणि नंतर त्या दुकानातील एक खाद्यपदार्थाचा पुडा देखील तिला दिला. त्यानंतर त्यांनी दुकानात प्रवेश केला आणि चहा बनवण्याची इच्छा व्यक्त केली.

यानंतर त्यांनी स्वता: चहा बनवला आणि लोकांना देखील पाजला. त्या स्वता: त्यांच्यात उभ्या राहून चहा पित होत्या. यावेळी चहा पिता पिता तेथील स्थानिकांशी चर्चा देखील केली. त्यांच्या या व्हायरल व्हिडिओचे सध्या अनेक जण त्यांचे कौतूक करत आहे.

You might also like