नंदिग्राममध्ये जखमी झाल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या – ‘माझ्यावर हल्ला झाला’

नंदिग्राम : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी नंदिग्राममध्ये प्रचारादरम्यान जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर हल्ला झाला असल्याचे सांगत त्यांनी याचे षडयंत्र भाजपने केल्याचे म्हंटले आहे. अर्ज भरल्यानंतर त्या सतत मंदिरात जाऊन लोकांना भेटत होत्या. दरम्यान एक ठिकाणी गर्दी असताना त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यावर सहानभूती मिळवण्यासाठी ममता बॅनर्जी प्रयत्न करीत आहेत, असा टोला भाजपने लावला.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, ”मी गाडीजवळ असताना ४-५ लोकांनी मला ढकलले.” माझा पाय चिरडण्याचा प्रयत्न केला. माझा पाय सुजला आहे. मी आता कोलकत्याला डॉक्टरकडे जात आहे. खूप वेदना होत आहेत. ताप आला आहे. तेथे कोणी पोलिसही नव्हता. ४-५ लोकांनी हे हेतुपुरस्कार केले आहे. हे षड़यंत्र आहे.” चार ते पाच जणांनी हल्ला केल्याचे टीएमसीने म्हंटले आहे. हे कट रचुन केले गेले आहे. पक्ष निवडणूक आयोगाकडे तक्रार करेल.

ममता बॅनर्जी यांना उपचारासाठी कोलकत्ता येथे नेले जात आहे. रात्र असल्याने हेलिकॉप्टर उडू शकत नाही, म्हणून ते रस्त्याने जात आहेत. यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कोलकातामधील दोन रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत.

भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय म्हणाले, ”त्या मुख्यमंत्री आहेत आणि इथली परिस्थिती आहे. त्यांच्यासोबत ३००-४०० पोलीस कर्मचारी असतात. ममता बॅनर्जी यांच्यावर हमला होईल? असे कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाहीत.” हल्ला दूरची गोष्ट आहे, कोणी त्यांच्याकडे ढुंकून पाहू शकत नाही. तो अपघात होऊ शकतो. पण त्यांच्यावर एखाद्याला आक्रमण करण्याचे धाडस येऊ शकत नाही. त्या सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ”भाजपचे प्रदेश प्रवक्ते समीक भट्टाचार्य म्हणाले की, लवकरच त्या बऱ्या होतील अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या भोवती पोलीस आणि समर्थक होते.”

पश्चिम बंगालमधील भाजपचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह म्हणाले,”तालिबान्यांनी त्यांच्या पायावर हल्ला केला का?” त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने पोलीस राहतात. त्यांच्याजवळ कोणी जाऊ शकते? त्यांच्या सौरक्षणासाठी ४ आयपीएस अधिकारी तैनात आहेत, त्यांना त्वरित निलंबित करावे. हल्लेखोरांना अटक केली पाहिजे. त्या सहानुभूतीसाठी नाटक करत आहेत.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी नंदीग्राम विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि नंदिग्राममधून कधीही रिकाम्या हाताने परतलो नसल्याचा विश्वास व्यक्त केला. या जागेवर त्यांचा मित्रपक्ष आणि आता भाजप नेते शुभेन्दू अधिकारी यांचा सामना होईल. टीएमसी अध्यक्ष सुवेत बक्षी यांच्या उपस्थितीत बॅनर्जी यांनी हल्दिया उपविभागीय कार्यालयात अर्ज दाखल केला.

यापूर्वी त्यांनी दोन किलोमीटर लांबीच्या रोड शोमध्ये भाग घेतला आणि मंदिरात प्रार्थना केली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बॅनर्जी प्रथमच दुसऱ्या मंदिरात गेल्या. कोलकत्यातील भवानीपूर जागा सोडल्यानंतर मुख्यमंत्री प्रथमच नंदीग्राम येथून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी नंदिग्राममध्ये एक घर भाड्याने घेतले आणि जिथून त्या प्रचार करतील.