PM मोदींच्या पत्नीस भेटण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची ‘दमछाक’, दिली ‘साडी’ भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्या ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींवर लोकसभेच्या निवडणूकीवेळी घणाघात केला होता, त्याच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी थेट पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांची भेट घेतली. जशोदाबेन झारखंड धनबाद येथून परत येत होत्या. तेव्हा अचानक कोलकत्ता विमानतळावर त्यांची भेट झाली.

मंगळवारी कोलकाता विमानतळावर ममता बॅनर्जी आणि जशोदाबेन यांची भेट झाली. जेव्हा जशोदाबन परतत होत्या तेव्हा ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी निघाल्या होत्या. जशोदाबेन यांना पाहिल्यावर ममता बॅनर्जी उत्साहाने त्यांची भेट घेण्यासाठी गेल्या.

ममता बॅनर्जी यांनी जशोदाबेन यांची भेट घेऊन त्यांच्याशी काही वेळ गप्पा देखील मारल्या. त्यानंतर त्यांनी जशोदाबेन यांना एक साडी देखील भेट दिली. जशोदाबेन यांनी पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील आसनसोलमधील कल्याणेश्वरी मंदिरात पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पूजा केली. भाजप कार्यकर्त्यांना याची माहिती नव्हती की त्या पश्चिम बंगालला येणार आहेत. परंतू राज्य प्रशासनाला ही माहिती असल्याने कल्याणेश्वरी मंदिरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Visit – policenama.com 

You might also like