निती आयोग म्हणजे ‘वंचित’ संस्था, ममतांनी चिठ्ठी लिहून मोदींना कळवला ‘नकार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. ममता बॅनर्जी यांनी मोदींना पत्र लिहून नीति आयोगाच्या बैठकीला येण्यास नकार दिला आहे. पंतप्रधान नीति आयोगाचे अध्यक्ष असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरूवारी नीति आयोगाच्या पुनर्गठनासाठी मंजुरी देखील दिली आहे. या बैठकीत जल प्रबंधन, सुरक्षा, कृषि या आणि इतर विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

परंतू या बैठकीला येणार नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी कळवले आहे. त्या म्हणाल्या कि ही सत्य परिस्थिती आहे की नीति आयोगाकडे ना की कोणतीही वित्तीय शक्ती आहे ना की राज्याच्या योजनेमध्ये मदतीसाठी त्यांना आधिकार त्यामुळे अशा कोणत्याही वित्तीय शक्ती नसलेल्या वंचित संस्थेच्या बैठकीत सहभागी होणे निरर्थक ठरेल. त्यामुळे आपण यात सहभाग घेणार नाही.

याआधी देखील ममता बॅनर्जी नीति निर्माता थिंक-टैंकच्या बैठकीत सहभागी झालेल्या नाहीत आणि योजना आयोगाला रद्द करुन त्याजागी नव्या नीती आयोगाच्या निर्मितीवर त्यांनी या आधी नाराजी देखील व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणूकांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये पंतप्रधान मोदी आणि मॅमता बॅनर्जी यांच्यात बराच वाद झाला होता. त्यांना एकमेकांवर बरीच चिखलफेक केली होती. त्यामुळे ममता बॅनर्जी नाराज आहेत. या आधी पंतप्रधान मोदींच्या शपथ विधीला उपस्थित राहण्यास देखील त्यांनी नकार दिला होता.