रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ काँग्रेस रस्त्यावर, काढला मोर्चा (Video)

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या विरोधात सुशांतचे फॅन्स सोशल मीडियातून व्यक्त होत असतानाच काँग्रेसने थेट रियाच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. कोलकात्यात हा रिया चक्रवर्तीला समर्थन देणारा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला राजकीय पक्षांनी पद्धतीने उचलून धरले आहे.

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अटक केल्यामुळे अनेेकांना मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर काँग्रेसचे लोकसभेतले नेते अधीररंजन चौधरी यांनी ट्वीट करत रिया चक्रवर्ती बंगाली ब्राह्मण असल्याचा जाहीर उल्लेख केला. तिला मुद्दाम लक्ष्य करण्यात येत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. बिहारच्या निवडणुकांकडे लक्ष ठेवून भाजप मुद्दाम सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे राजकारण करत आहे. त्यामुले सुशांतला न्याय मिळाला पाहिजे हे खरं पण सुशांतला न्याय म्हणजे बिहारला न्याय असे चित्र रंगवणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सगळ्या पार्श्वभूमीवर कोलकात्यात काँग्रेस रियाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली. रियाविरुद्ध मीडिया ट्रायल थांबवा. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राजकारण नको, असे म्हणत रियाला समर्थन देणारे बॅनर्स काँग्रेसच्या मोर्चात दिसून आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like