WB : बॉम्ब बनवताना स्फोट; भाजपमधील 6 जण जखमी, भाजप-TMC चा एकमेकांवर आरोप

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल राज्यात निवडणुकांचे वादळ घुमू लागले असून. या निवडणुकीमध्ये भाजप आणि टीएमसीमध्ये जोरदार चुरस लागणार असल्याचं दिसत असतानाच, दक्षिण २४ परगणा या परिसरातील गोसाबामध्ये बाँबस्फोट घडून आला आहे. तर देशी बाँब तयार करताना हा बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर प्राथमिक माहितीनुसार बाँब बनवत असताना हा स्फोट झाला आहे. असे पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान, या झालेल्या बॉम्बस्फोटावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेस हे एकमेकांच्यावर आरोप करत आहेत. या स्फोटामध्ये भाजप पक्षाचे सहा कार्यकर्ते जखमी झाले आहेत. तर भाजपचे कार्यकर्ते बाँब बनवत होते त्यावेळी हा स्फोट झाला. असा आरोप तृणमूल काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे. तसेच टीएमसीच्या लोकांनी भाजप कार्यकर्त्यांवर जाणूनबुजून हा हल्ला केला आहे. असा आरोप भाजपाकडून होत आहे.

दरम्यान, भाजपचे कार्यकर्ते त्यांच्यापैकी एकाच्या घरी बाँब बनवत होते, त्यावेळी हा स्फोट झाला. असे तृणमूल काँग्रेसचे जयंत नस्कर यांनी म्हटले आहे. तर भाजपचे लोक अँटी सोशल लोकांना सोबत घेत आहेत. बाँब बनवत असताना ६ ते ७ लोकं जखमी झाले असून त्यातील काही जण मृत्यूदेखील पडू शकतात, असंही नस्कर यांनी म्हटले. तर गेल्या अनेक वर्षांपासून जयंत नस्कर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर बाँब फेकले जातात. भाजप कार्यकर्त्यांना बंदुक दाखवून धमकी दिली जाते, त्याचाच हा नमुना होता असे भाजपचे संजय नायक यांनी आरोप फेटाळत म्हटले आहे.