WB Election : …अन् PM मोदींनी थेट ‘त्या’ भाजप कार्यकर्त्याचे पाय धरले, पाहा व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाईन – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही मोठ्या सभा येथे सुरु आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींच्या एका प्रचार सभेचे वेगळेच चित्र पाहयला पाहयला मिळाले आहे. कांथीमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभेचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर स्थानिक भाजप मंडळी उपस्थित होती. तेंव्हा अचानक एक भाजप कार्यकर्ता मोदींच्या पाया पढण्यासाठी पुढे सरसावला. त्याचवेळी मोदीनीही थेट त्या कार्यकर्त्याचे पाय धरले अन् वाकून नमस्कार करत असे करत जाऊ नका, असे सूचित केले. या संपूर्ण प्रकाराचा एक व्हिडिओ भाजपने आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केला आहे.

 

 

 

भाजपने याबाबत एक ट्विट केले असून भाजपा एक सुसंस्कृत संघटना असल्याचे म्हटले आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांबद्दल सन्मान आणि आदर आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक रॅली दरम्यान व्यासपीठावरील एका कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पायाला स्पर्श केला आणि नमस्कार केला. तर मोदींनीही या कार्यकर्त्याला वाकून नमस्कार केला असे भाजपने म्हटले आहे.