West Bengal Election : तृणमूल काँग्रेसला निर्णायक आघाडी, बहुमताचा आकडा पार

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यासह पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये मतदारांनी कोणाला कौल दिला आहे, आहे आज स्पष्ट होणार आहे. आज सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी 147 चा आकडा पार करावा लागणार आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे चित्र आता स्पष्ट होत आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. तृणमूलने सत्तेकडे वाटचाल केली आहे. पश्चिम बंगालमध्ये झेंडा फडकवण्याचा भाजपचा प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने तब्बल 189 जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी लागणारा 147 चा आकडा तृणमूलने सहज पार केला आहे. तर भाजप 89 जागांवर आघाडी घेतली आहे.

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांत झालेल्या मतदानामुळे इतर राज्यांपेक्षाया राज्यात निकाल जाहीर होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागांपैकी 292 जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. तर दोन ठिकाणी मतदान रद्द करण्यात आले होते. या ठिकाणी फेरनिवडणूक घेण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या पक्षांना बहुमत मिळवण्यासाठी 147 चा आकडा पार करावा लागणार आहे.