मिथुन चक्रवर्तींना Y+ सुरक्षा; BJP मध्ये एन्ट्री केल्यानंतर गृहमंत्रालयाने दिली परवानगी ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली. बुधवारी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याला मंजुरी देण्यात आली. त्यांना राखीव पोलीस दलातर्फे सुरक्षा पुरवली जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच त्यांना केंद्रानं Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमधील प्रवेशादरम्यान पंतप्रधानांसोबत मंचावर उभं राहण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. या सभेमध्ये ते आक्रमक भूमिकेत दिसून आले.

मी कोब्रा.. दंश केल्यास फोटो लागेल

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी रविवारी कोलकाता मधील ब्रिगेड ग्राऊंड येथे भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपच्या या रॅलीमध्ये त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. त्यावेळी ते आक्रमक भूमिकेत दिसून आले. या रॅलीमध्ये  “मी एक नंबरचा कोब्रा आहे… एक दंश जरी झाला तरी तुम्ही फोटो बनून जाल,” असे म्हणले आहे. तसेच “मी बंगाली आहे त्याचा मला अभिमान आहे. मला माहितीये की तुम्हाला माझे डायलॉग्ज आवडतात,” असे सुद्धा मिथुन चक्रवर्ती  म्हणाले. यादरम्यान त्यांनी आपल्या चित्रपटातील एका डायलॉगदेखील म्हटला. “हे सर्व पाहून आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे. मी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाच्या पंतप्रधानांसह मंचावर उभा राहणार आहे. हे खरंच स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे,”  असे देखील मिथुन चक्रवर्ती म्हणाले.