कोलकातामध्ये PM मोदी म्हणाले – ‘लोकसभेत TMC ‘हाफ’, यावेळी पूर्ण ‘साफ’; जाणून घ्या भाषणातील 10 विशेष मुद्दे

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाला मजबूत करण्यासाठी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाताच्या ब्रिगेड ग्राऊंडमध्ये भव्य रॅलीला संबोधित केले. ब्रिगेड ग्राऊंडमध्ये निवडणूक सभेला संबोधित करताना पीएम मोदी यांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

पीएम मोदी म्हणाले, ’बंगालमध्ये परिवर्तनासाठी ममता दीदीवर विश्वास ठेवला होता परंतु दीदी आणि त्यांच्या कॅडरने तो विश्वास तोडला. तुमची स्वप्न धुळीस मिळवली. या लोकांनी बंगालला अपमानित केले. येथील बहिणी-मुलींवर अत्याचार केले. परंतु हे लोक बंगालच्या लोकांची जिद्द कधीही तोडू शकले नाहीत. पीएम मोदी यांनी म्हटले की, यावेळी तुम्हाला जोराने छाप, टीएमसी साफ च्या हेतूने पुढे जायचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 खास मुद्दे…

* नरेंद्र मोदी म्हणाले, आज भारत स्वातंत्र्याच्या 75 वर्षात प्रवेश करत आहे, तर बंगाल एक नवी उर्जा, एक नव्या संकल्पासह पुढे जाईल. देशाप्रमाणेच बंगालच्या विकासासाठी पुढील 25 वर्ष खुप महत्वाची आहेत. या 25 वर्षाच्या सुरूवातीचा टप्पा ही विधानसभा निवडणूक आहे.

* बंगालमध्ये पोर्टपासून एक्सपोर्टपर्यंत, टी पासून टूरिझमपर्यंत, माशांपासून भातापर्यंत येथील समुद्रामध्ये सर्वकाही आहे, जे जीवन चांगले बनवण्यासाठी आवश्यक आहे. पारदर्शी व्यवस्था येथे पुन्हा सुरू होईल आणि केंद्र सरकारच्या योजना येथे स्किल डेव्हलपमेंटसाठी लागू होतील.

* पंतप्रधान म्हणाले, आमचे लक्ष्य केवळ पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन नाही, आम्हाला बंगालच्या राजकारणाला विकास केंद्रीत राजकारणाकडे घेऊन जायचे आहे. खुप वर्ष झाली, आता बंगालला बरबाद करण्याची संधी कुणालाही देऊ नये. बंगालच्या लोकांनी हे सुद्धा लक्षात ठेवावे की, त्यांच्याशी कशाप्रकारे सातत्याने छळ केला जात आहे.

* मी विश्वास देण्यासाठी आलो आहे की, तुमच्यासाठी, येथील तरूणांसाठी, शेतकरी, उद्योजक, येथील बहिणी-मुली यांच्या विकासासाठी आम्ही 24 तास दिवसरात्र मेहनत करू. आम्ही मेहनत करण्यात कोणतीही कमतरता सोडणार नाही.

* दीदी आज पश्चिम बंगालचे तरूण, येथील मुली-बहिणी तुम्हाला प्रश्न विचारत आहेत. त्यांनी तुम्हाला दीदीच्या भूमिकेत निवडले. परंतु तुम्ही स्वताला एका पुतण्याच्या आत्यापर्यंतच मर्यादित का ठेवलेत?

* नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, माझ्यावरील रागातून काय-काय म्हटले जात आहे. कधी रावण, कधी राक्षस, कधी गुंडा…दीदी…इतका राग का? जर आज बंगालमध्ये कमळ फुलत आहे तर त्याचे कारण तोच चिखल आहे जो तुमच्या पक्षाच्या सरकारने येथे पसरवला.

* गरीबांची चिंता करणे, त्यांची सेवा करणे आमचे कर्तव्य नाही का? आम्ही यावर सुद्धा राजकारण करू का? परंतु दुर्दैव्य, टीएमसी सरकार हेच करत आहे. प्रत्येक घरात पाणी पोहचवण्यासाठी केंद्र सरकार जो पैसा पाठवत आहे, त्याचा खुप मोठा हिस्सा आजपर्यंत येथील सरकार खर्च करू शकलेले नाही.

* बंगालमध्ये भिती आणि भयाचे दिवस 2 मे च्या नंतर चालणार नाहीत. तुम्ही घरोघरी जा. सरकारी कर्मचार्‍यांना सुद्धा विनंती करेन की, कोणत्याही दबावाशिवाय काम करा.

* लोकशाही सर्वोतोपरी आहे. प्रत्येक मतदाराला सांगेन की, लोकसभा निवडणुकीत तुमचा मंत्र होता – चुपचाप कमल छाप. यावेळी तुम्हाला जोर से छाप, टीएमसी साफ च्या हेतूने पुढे जायचे आहे. ब्रिगेड मैदान पुन्हा बंगालमध्ये लोकशाही स्थापन करण्यासाठी निघाले आहे आणि तुम्ही त्याचे साक्षीदार बनाल.

* बंगालच्या भाजपा कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतो की, मी तुमचे तप, तुमचा त्याग आणि बलिदानासमोर नतमस्तक आहे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कुटुंबाला, पश्चिम बंगालमध्ये अन्याय झालेल्या प्रत्येकाला न्याय देण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत.

* पीएम मोदींच्या रॅलीच्या अगोदर मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले. आपल्या भाषणात पीएमने म्हटले, आज आपल्यात मिथुन चक्रवर्ती सुद्धा आहेत. त्यांची जीवनगाथा संघर्ष आणि यशाने भरलेली आहे. आपल्या यशाचे पुण्य ते लोकनाथ बाबांच्या आशीर्वादाने सामान्य लोकांपर्यंत पोहचवत राहिले आहेत.