प्रसिध्द बंगाली अभिनेत्री पायल सरकारचा भाजपात प्रवेश

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर आल्याने निवडणुकीचे वारे जोराने वाहत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा यांचा गड वाचवण्याकडे कल आहे. तर दुसरीकडे भाजपने येथे बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. क्रिकेटपासून फिल्मी जगतातील अनेकांना पक्षात सामावून घेण्यात भाजपला यश येत आहे. त्यातच पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध अभिनेत्री पायल सरकार हीने गुरुवारी (दि. 25) भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

कोलकातामधील एका कार्यक्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थित होते. मनोरंजन क्षेत्रात स्वत:च नाव कमवल्यानंतर आता पायल सरकारने राजकीय क्षेत्रात उडी घेतली आहे. पायल ही टॉलिवूड सिनेमातील प्रमुख अभिनेत्री आहे. तिने सुरुवातील मॉडेलिंगमधून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर बंगाली सिनेमांमध्ये पायलने तिच्या अभिनयाची छाप पाडली, करिअरच्या सुरुवातीला पायलने 2006 मध्ये बिबर नावाचा पहिला सिनेमा केला. तिने आतापर्यंत अनेक सिनेमे केले असून बरेच पुरस्कारही तिच्या नावावर आहेत. पायल ही प्रसिध्द बंगाली मॅग्जिन उनिश कुरीच्या कव्हर पेजवरही झळकली आहे. 2010 मध्ये ले चक्का’साठी तिला सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे, 2016 मध्येही जामेर राजा दिलो बोर नावाच्या चित्रपटासाठीही तिला पुन्हा सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.