Coronavirus Impact : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर प. बंगालमध्ये 10 लाख वैद्यकीय कर्मचार्‍यांना 5 लाखाच्या विम्याची घोषणा

कोलकाता : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्याला आवर घालण्यासाठी केंद्रासह देशातील सर्व राज्यांकडून खबरदारी बाळगली जात आहे. अनेक उपाय योजना राबवल्या जात आहेत. सरकारने सर्वांना घरुन काम करण्याचे आवाहन केले आहे.

वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी सक्षमतेने कोरोनाशी लढा देत आहेत.कोरोनाला रोखण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. याचमुळे त्यांची सुरक्षा लक्षात घेता पश्चिम बंगाल सरकारने मोठी घोषणा केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या सरकारने वैदयकीय कर्मचाऱ्यांना 5 लाखाच्या विम्याची घोषणा केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये देखील इतर राज्याप्रमाणे कोरोनाचे सावट आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पश्चिम बंगाल सरकारकडून 5 लाखाच्या विम्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील सर्व 10 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना 15 एप्रिलपर्यंत हा विमा देण्यात येणार आहे.

विविध राज्ये केंद्रासह कोरोनावर खबरदारी म्हणून उपाय योजना राबवत आहेत. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 4 जणांचा बळी गेला आहे.