WB मध्ये ‘मुख्यमंत्री – राज्यपाल’ वाद ! ममता बॅनर्जी म्हणाल्या – ‘तू चीज बडी है मस्त-मस्त’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद संपण्याचं नाव घेत नाहीये. आता राज्यपाल धनखड यांनी आरोप लावला की ममता बॅनर्जी यांनी आपल्यावर अभद्र टीका केली. बुधवारी ट्विट करत धनखड यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. पहिल्यांदा देखील दोघांमध्ये मोठा वाद झाला होता.

राज्यपाल धनखड यांनी ट्विट केलं की मुख्यमंत्री मला कथित स्वरुपात म्हणाल्या आहेत की ‘तू चीज बडी है मस्त मस्त’. या ट्विटमध्ये त्यांनी एका बांग्ला वृत्तपत्राचा उल्लेख केला आहे. या वृत्तपत्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यपालाचे नाव न घेता, ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ म्हटले . 1994 सालच्या मोहरा या प्रसिद्ध सिनेमातील हे गाणे आहे.

https://twitter.com/jdhankhar1/status/1199689327980072962

संविधान दिवशीही दोघात नाही झाला संवाद –
राज्यपाल धनखड यांनी बुधवारी दुपारी एका ट्विटमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संविधान दिवसावर कार्यक्रम झाल्यानंतर मिडियाशी बोलत होत्या. धनखड यांनी सांगितले की मी पण सन्मान राखण्यात कोणतीही कसर सोडली नाही, मग एखादी व्यक्ती माननीय मुख्यमंत्री का असेना, मी त्यांचा व्यक्तीगत स्वरुपात सन्मानच करतो. भारतीय संविधान स्विकारुन 70 वर्ष पूर्ण झाल्याच्या कारणाने संविधान दिवसावर आयोजित कार्यक्रमात ममता आणि राज्यपाल यांनी एकमेकांबरोबर कोणतीही भाष्य केले नाही.

मी उत्तर देणं योग्य समजलं नाही – राज्यपाल
राज्यपालांनी ट्विटमध्ये लिहिले की, 27 नोव्हेंबरला वृत्तपत्रात ही बातमी छापली गेली होती. यात विधानसभेतील संविधान दिवसाचा उल्लेख आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्यपालांना म्हणाल्या होत्या की तू ‘चीज बडी है मस्त मस्त’, यावर मी उत्तर देणं योग्य समजलं नाही कारणं मी त्यांच्या पदाचा सन्मान करतो.

https://twitter.com/jdhankhar1/status/1199681270348779520

ममता-धनखड यांच्यात वाद –
यााआधी देखील ममता बनर्जी आणि जगदीप धनखड यांच्यात वाद झाला आहे. ममता यांनी राज्यपालांवर टीका करताना सांगितले होते की मी राज्यपालांशी कधीही वाद घातला नाही, परंतू ते तशी परिस्थिती निर्माण करतात. एवढच काय तर पंतप्रधान मोदींनी देखील असे वर्तन केले नाही. एकदा मुर्शिदाबादच्या एका कॉलेजच्या कार्यक्रमात पोहचण्यासाठी राज्यपालांनी हेलिकॉप्टरची मागणी केली होती. परंतू ममता बॅनर्जी यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर राज्यपालांना 300 किलोमीटरचे अंतर रस्तेमार्गे यावे लागले.

Visit : Policenama.com