बंगालच्या राज्यपालांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट ; बंगालमधील हिंसाचाराची दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर सुरु झालेला राजकीय हिंसाचार दिल्ली पर्यंत पोहचला आहे. बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्रिपाठी यांनी गृहमंत्री अमित शहा यांना बंगालमधील राजकीय हिंसाचार आणि सध्य परिस्थिती यांविषयी ४८ पानांची माहिती दिली आहे. त्रिपाठी यांनी हि भेट म्हणजे शिष्टचाराचा भाग असल्याचे सांगितले आहे. त्रिपाठी म्हणाले की, त्यांनी फक्त राज्यातील परिस्थितीची माहिती अमित शहा यांना दिली आहे.

या दरम्यान, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपर बंगालमध्ये हिंसाचार पसरवल्याचा आणि बंगालचे सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हंटले की मी कोणलाही बंगालचे सरकार पाडू देणार नाही.

दरम्यान, बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची बिघडत चाललेल्या परिस्थितीवर गृहमंत्री अमित शहा यांनी अंतर्गत सुरक्षेवर उच्च स्तरीय बैठक घेतली. बैठकीत सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. बैठकीत बंगालमध्ये सुरु असलेल्या हिंसाचार चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. बैठक संपल्यानंतर राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.