Video : WB : ‘BJP Vs TMC’ मध्ये वाद सुरूच, हावडामध्ये भर रस्त्यात ‘हनुमान चालीसा’चे ‘पठण’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या पश्चिम बंगालमध्ये परिस्थिती काही शांत नाही. तेथे रोज भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु असतात. मात्र आता वातावरण अधिक तापले असून उत्तर हावडा भाजपकडून बजरंगबली मंदिरात हनुमान चालीसाच्या पाठाचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने डबसन रोडवर असलेल्या बजरंग बली मंदिरात पोहचले. मंदिरात अशी काही गर्दी वाढली की अखेर भक्तांनी रस्ता अडवून रस्त्यावर बसून हनुमान चालिसा म्हणण्यास सुरूवात केली.

रस्ता जाम –

कायम गर्दीने भरलेल्या या रस्तावर असा प्रकार घडल्याने रस्ता बंद करावा लागला. भक्त थेट रस्तावरच हुनमान चालीसा म्हणण्यास बसल्याने रस्ता जाम झाला होता. अर्ध्या तासासाठी रस्ता बंद करण्यात आला. शेवटी पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागले. वाहतूक नियंत्रण कक्षाच्या पोलिसांनी वाहतूकीचा चक्क जाम सोडवला.

हेतूपुरक नाही –

भाजप नेता उमेश राय यांनी सांगितले की, प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण होते. परंतू आज भक्तांची संख्या अधिक होती. त्यामुळे भक्तांना बाहेर रस्त्यावर बसून पठण करावे लागले. हे पठण मुद्दामहून त्रास देण्याच्या, सूड उगवण्याच्या भावनेतून करण्यात आलेेले नाही.

काही दिवसांपुर्वी देखील असाच प्रकार घडला होता, ज्यात हनुमान चालिसा म्हणण्यासाठी लोक रस्त्यावर बसले होते, ज्यामुळे रस्ता अडवला गेला होता. हा वाद नमाज पठण करण्यावरुन सुरु झाला होता. मुस्लिम लोक रस्त्यात कोठे ही नमाज पठणासाठी बसतात हा या वादाचा मु्द्दा होता. याचे पडसाद संसदेत देखील उमटले होते.

सावधान ! तर मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका, ‘ही’ आहेत कारणे

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

रोहित पवार या मतदारसंघातून लढणार

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

शाळकरी मुलांच्या आरोग्यासाठी डबेवाल्यांचा पुढाकार

मुंबईत जून महिन्यात हेपेटायटिसच्या रूग्णांची संख्या वाढली

 

Loading...
You might also like