West Bengal Police recruitment 2021 : वायरलेस ऑपरेटरच्या 1251 पदांसाठी भरती, 12 वी पास करू शकतात अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Police recruitment 2021 : पश्चिम बंगाल पोलीस भरती बोर्डाने 12 वी पाससाठी भरती काढली आहे. बोर्डाने वायरलेस ऑपरेटरची पदे भरण्यासाठी एक नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार एकुण 1251 पदावर नियुक्त्या केल्या जातील. यामध्ये 1126 एकुण पुरुष उमेदवरांची आणि महिला उमेदवारांची 1251 पदांवर नियुक्ती केली जाईल. उमेदवार अधिकृत पोर्टल wbpolice.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया 22 फेब्रुवारी पासून सुरू झाली असून 22 मार्च 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील. अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 आहे. पंजाब नॅशनल बँक चलानचा वापर करून ऑनलाइन पैसे भरता येतील. उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष असावे. तर कमाल वय 27 फेब्रुवारी 2021 ला 27 वर्षे असावे.

व्हॅकन्सी डिटेल्स
खुला वर्ग
* पुरुष- 618
* महिला 68

एससी
* पुरुष- 248
* महिला- 28

एसटी
* पुरुष- 68
* महिला- 8

ओबीसी ए
* पुरुष- 113
* महिला- 12

ओबीसी बी
* पुरुष- 79
* महिला- 9

शैक्षणिक पात्रता
वायरलेस ऑपरेटर पदासाठी बंगाली भाषेत वाचता आणि लिहिता आले पाहिजे. मात्र, दार्जिलिंगसह अन्य पर्वतीय उप-विभागातील स्थानिकांना भाषेचे बंधन लागू नाही.

वायरलेट ऑपरेट पदावर अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जा. यानंतर होमपेजवर त्या अधिसूचनेच्या लिंकवर क्लिक करा ज्यासाठी अर्ज करायचा आहे. यानंतर जर उमेदवार रजिस्टर्ड नसेल तर क्रेडेंशियलसह साइन इन करावे. यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. प्रिंट डाऊनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट ठेवून द्या.